एआयसाठी विश्वास कारखाना देणार ६७५० रुपयांचे अनुदान

आवडल्यास ही बातमी शेअर करा

सांगली : एआय तंत्रज्ञानासाठी शासन, जिल्हा मध्यवर्ती बँक प्रत्येकी नऊ हजार, तर कारखाना कार्यक्षेत्रात ऊस उत्पादन वाढविण्यासाठी विश्वासराव नाईक साखर कारखान्यामार्फत ६७५० रुपये अनुदान देण्यात येणार असल्याची माहिती विश्वासराव नाईक साखर कारखान्याचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी दिली. चिखली (ता. शिराळा) येथील लोकनेते फत्तेसिंगराव नाईक सभागृहात आयोजित कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत अध्यक्षपदावरून ते बोलत होते.

यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शिवाजीराव नाईक, युवानेते विराज नाईक, दूध संघाचे अध्यक्ष अमरसिंह नाईक, राजेंद्रसिंह नाईक, सम्राटसिंह नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती.  याप्रसंगी दिनकर पाटील, विजयराव नलवडे, सुरेश चव्हाण, विश्वास पाटील, रणजितसिंह नाईक, दत्तात्रय पाटील, प्रमोद नाईक, भूषण नाईक, विवेक नाईक, डॉ. राजाराम पाटील, अनिल पाटील, हंबीरराव पाटील, देवेंद्र नाईक, तानाजीराव साळुंखे, विजय पाटील, संचालक, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वीस कोटी रुपयांचे दोन प्रकल्प उभारणार

विश्वासराव नाईक साखर कारखान्यामार्फत सौर ऊर्जा व कॉम्प्रेस्ड बायोगॅस असे वीस कोटी रुपयांचे दोन प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. राज्यामध्ये असे प्रकल्प राबविणारा पहिला सहकारी साखर कारखाना ठरेल, असा विश्वासही कारखान्याचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी केले.

तोटा भरून काढणार

कारखान्याने गाळप क्षमता दहा हजार मेट्रिक टन प्रतिदिन, डिस्टलरी प्रकल्प दोन लाख लिटर प्रतिदिन वाढविण्यात येणार आहे. सहवीजनिर्मिती प्रकल्पातील वीज दर कमी होणार आहे त्यामुळे होणारा तोटा भरून काढण्यासाठी दीड टनाचे सौर ऊर्जा, प्रेसमेड व डिस्टलरी प्रकल्पातून बाहेर पडणाऱ्या पाण्यावर प्रत्येकी पाच टनांचे दोन कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. इथेनॉल प्रकल्पाचे फक्त देणे आहे. मात्र, कारखान्याची एक रुपयाही कोणाची थकबाकी नसल्याचे मानसिंगराव नाईक म्हणाले.

सर्वांना रोपे देण्याचा आमचा प्रयत्न

मानसिंगराव नाईक म्हणाले, शेतकऱ्यांना अनुदानावर ऊस रोपे देत आहोत. तसेच काही नर्सरींशी करार करून ही रोपे सर्वांना देण्याचा आमचा प्रयत्न आहे. ऊस उत्पादक शेतकरी व कर्मचारी हे दोन चाके आहेत त्यास आर्थिक शिस्तीची साथ मिळाली तर सर्वांगीण विकास होईल.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »