ट्वेन्टी वन शुगर्सचे एक लाख मे. टन ऊस गाळप

आवडल्यास ही बातमी शेअर करा

लातूर : प्रतिनिधी- टवेन्टिवन शुगर्स लि. मळवटी येथील कारखान्याने ऊस गाळपात आघाडी घेऊन अवघ्या २७ दिवसात १ लाख मे. टन पेक्षा अधिक ऊसाचे गाळप केले आहे. तर शुभ्रदाणेदार १ लाख ८० हजार साखर पोत्याचे ऊत्पादन केले आहे.

या हंगामात विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा परीवारातील परंपरेला साजेसा ऊच्चांकी अंतीम ऊसदर देण्यात येणार असल्याने ऊस उत्पादकांनी आपला जास्तीत जास्त ऊस या कारखान्यास गाळपासाठी दयावा, असे आवाहन कारखान्याच्या वतीने करण्यात आले आहे. या हंगामात टवेन्टिवन शुगर्सने विक्रमी गाळप आणि साखर ऊत्पादन केल्याबद्दल राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी सर्वांच अभिनंदन करुन हंगामाच्या पूढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

या साखर कारखान्याने दैनदीन ऊसगाळपात आघाडी घेतली असून केवळ २८ दिवसात १ लाख मे. टनापेक्षा अधिक ऊसाचे विक्रमी गाळप केले आहे. या हंगामाच्या सुरुवातीपासूनच ऊसतोडणी यंत्रणेचा आणि गाळपासाठी तांत्रीक कार्यक्षमतेने पूर्ण वापर करुन गाळप केले जात आहे. टवेन्टिवन शुगर्स कारखान्याकडून चालू गळीत हंगाम २०२३-२०२४ साठी गाळप झालेल्या ऊसाला ऊसदरा पोटी प्रतिटन २ हजार ५०० रुपये शेतक-यांच्या खात्यावर जमा केले आहेत.

टवेन्टिवन शुगर्स साखर उदयोगात अत्याधुनीक साखर कारखाना म्हणून नावारुपाला आला आहे. कारखान्याने पहील्या हंगामापासूनच साखरनिर्मितीबरोबर सहवीजनिर्मीती प्रकल्प, आसवनी प्रकल्प सुरु करण्यास प्राधान्य दिले आहे. या प्रकल्पामुळे कारखाना आर्थिकदृष्टीने सक्षम होईल, यामुळे भविष्यात सभासद, ऊसउत्पादक यांना चांगला ऊसदर देणे शक्य होणार आहे. या हंगामात ऊसतोडणी व वाहतूक यंत्रणा अधिक कार्यक्षमपणे राबवली जात आहे. कोणत्याही तांत्रीक कारणाने कारखाना ऊस गाळप प्रक्रीया थांबणार नाही याची दक्षता घेतली जात आहे. सर्व सभासद आणि ऊसउत्पादकांच्या ऊसाचे वेळेवर गाळप होत आहे.

गळीत हंगामाच्या २७ व्या दिवशी १ लाख मे. टन ऊसाचे गाळप आणि १ लाख ८० हजार साखर पोत्याचे उत्पादन झाले आहे. गळीत हंगामात ऊसतोडणी वाहतूक यंत्रणा व तांत्रीक कार्यक्षमतेचा पूर्ण वापर केला जात आहे, पावसाची परिस्थिती पाहता हंगामात पाण्याची बचत करून पाण्याचा पूर्नवापर केला जात आहे, हंगामात कारखाना बंद राहणार नाही यांची काळजी घेतली जात आहे.

विकासरत्न विलासराव देशमुख साहेब यांची प्रेरणा, माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांचे मार्गदर्शन व संस्थापक चेअरमन माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांचे नेतृत्वाखाली टवेन्टिवन शुगर्स यशस्वीपणे वाटचाल करीत आहे. गळीत हंगामाच्या सुरूवातीलाच ऊस गाळप आणि साखर उत्पादनात विक्रम केल्या बद्दल माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी ऊस उत्पादक शेतकरी, कारखान्याचे आधिकारी, कर्मचारी वर्ग, वाहतूक ठेकेदार, तोडणी मंजूर व कंत्राटदार या सर्वांचे अभिनंदन केले आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Select Language »