ऊस ट्रक-दुचाकीच्या धडकेत दोन तरुण ठार

पाथर्डी : तालुक्यातील मिरी येथे पांढरीपूल-शेवगाव रस्त्यालगत उसाने भरलेल्या एका भरधाव रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुचाकीला जोरदार धडक बसली. यात दोन तरुण जागीच ठार झाले आहे. गणेश किसनराव वाघ (३९) आणि तेजस देविदास जगताप (१९, दोघेही रा. मिरी, ता. पाथर्डी) अशी त्यांची नावे आहेत.
दरम्यान, अपघातानंतर ट्रकचालकाने बेजबाबदारपणे वाहन पळवून नेण्याचा प्रयत्न केला असता ट्रॅक्टरसह आणखी इतर वाहनांना धडक दिली. पोलिसांनी तातडीने धाव घेत घटनास्थळाची पाहणी करून अधिक तपास सुरू आहे. सदरचा ट्रक वांबोरी येथील प्रसाद शुगर या खासगी साखर कारखान्याकडे ऊस वाहतूक करत होता, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. दरम्यान, चालकाने बेधुंदपणे व नशेमध्ये ट्रक चालवत असताना पांगरमल ते खोसपुरी दरम्यान या ट्रकने एका ट्रॅक्टर-ट्रॉलीला धडक दिली. त्यात ट्रॅक्टरचालक थोडक्यात बचावला. दरम्यान, मिरी येथून काही युवक ट्रकचा पाठलाग करत होते. त्यातच चालकाचे नियंत्रण सुटून ट्रक रस्त्यालगतच्या शेतात गेला. त्यांच्या मागे पत्नी, दोन लहान मुले, आई-वडील, तीन विवाहित बहिणी असा परिवार आहे. तेजस जगताप बांधकाम साहित्य दुकानात कामगार होता. त्याच्या मागे आई-वडील, लहान भाऊ व बहीण असा परिवार आहे.






