‘उदगिरी शुगर’ ला बेस्ट को-जनरेशन पॉवर प्लॅन्ट पुरस्कार

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे : को-जनरेशन असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेने उदगिरी शुगर अॅन्ड पॉवर लि. या साखर कारखान्याच्या सहवीज निर्मिती प्रकल्पास खासगी साखर कारखाना कॅटॅगरीमध्ये बेस्ट को-जनरेशन पॉवर प्लॅन्ट पुरस्कार असो.चे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते खा. शरद पवार यांच्या हस्ते पुणे येथे शानदार समारंभात प्रदान करण्यात आला.

हा पुरस्कार को जन असोसिएशनचे उपाध्यक्ष जयप्रकाश दांडगांवकर, नॅशनल शुगर इन्स्टिट्युट, कानपूरचे संचालक नरेंद्र मोहन, एसीएमई सौलर होल्डींगचे डायरेक्टर सुभाष कुमार, जॉइंट सेक्रेटरी (बायोमास) एमएनआरई नवी दिल्लीचे दिनेश जगदाळे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत उदगिरी शुगरला प्रदान करण्यात आला. उदगिरी शुगरचे संस्थापक चेअरमन डॉ. शिवाजीराव कदम आणि चेअरमन व एमडी डॉ. राहुलदादा कदम यांनी कारखान्याच्या टीमसह पुरस्कार स्वीकारला. या यशाबद्दल त्यांनी संपूर्ण टीमचे अभिनंदन केले.

उदगिरी शुगरचे संस्थापक डॉ. शिवाजीराव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना वेगाने प्रगती करत आहे. साखर उद्योगासाठी या कारखान्याने अल्पावधीत अनेक आदर्श उभे केले आहेत. आतापर्यंत कारखान्याला राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Select Language »