‘उदगिरी’कडून सामाजिक संस्थाना मदतीचा हात
‘सीएसआर’ निधीचे वितरण
सांगली – बामणी येथील उदगिरी साखर कारखान्याच्या २३/२४ आर्थिक वर्षातील सीएसआर निधीचे वाटप कारखान्याचे संस्थापक डॉ. शिवाजीराव कदम आणि कारखान्याचे चेअरमन व एमडी डॉ. राहुलदादा कदम यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.
यावेळी उदगिरी कारखान्याचे संस्थापक डॉ. शिवाजीराव कदम म्हणाले, कारखान्याच्या माध्यमातून सीएसआर फंड (सामाजिक उत्तर दायीत्व निधी) मधून विविध शैक्षणिक व सामाजीक संस्थांना दरवर्षी निधी देण्यात येतो. या वर्षीचे सीएसआर निधीमधून शाळांना संगणक संच, शाळा दुरुस्ती, वर्ग खोली बांधणे, कंपाऊंड बांधणे, बालापेंटींग करणे, मुला-मुलींकरिता स्वच्छतागृह बांधणे करिता निधी देण्यात आला आहे.
पिण्याच्या पाण्यासाठी विहीर खुदाई करिता, वृद्ध व लहान मुलांकरिता बगीचा, वाचनालय, कचरा गोळा करण्यासाठी घंटा गाडी करताही निधी दिला आहे.
सिंधुताई संकपाळ यांच्या अनाथाश्रमाकरिता आणि पुणे येथील अंधशाळेला त्याचप्रमाणे विटा येथील मुकबधीर शाळेला मदत दिलेली आहे. यशोधन चॅरिटेबल ट्रस्टमार्फत चालविल्या जाणाऱ्या अनाथ व बेघर महिलांचे स्वच्छतागृह करिता मदत केली आहे. त्याच प्रमाणे टीबी मुक्त भारत अभियान योजनेअंतर्गत रुग्णांना कोरडा सकस आहार देण्यासाठी आर्थिक मदत दिली आहे. रयत शिक्षण संस्थेच्या रामानंदनगर येथील कॉलेजच्या रिसर्च व डेव्हलमेंट करिता निधी वाटप केल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन डॉ. राहुलदादा कदम यांनी दिली.
डॉ. शिवाजीराव कदम व कारखान्याचे चेअरमन डॉ. राहुलदादा कदम यांनी विविध शाळांना व सामाजिक संस्थांना निधीचे वाटप केल्याबद्दल प्राचार्य दिनकर पाटील, प्राचार्य ए. डी. चौगुले, रोहित जगदाळे, डेप्यु. सरपंच, अंबक, मुख्याध्यापक, श्री अंबिका विद्यामंदीर, तोंडोली, सुभाष पाटील, संदीप मुळीक, प्राचार्या यु. व्ही. पाटील मॅडम यांनी आभार व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमासाठी विविध गावातील पदाधिकारी, शाळा कमिटीचे सदस्य, शिक्षक, विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौंसिल सदस्य डिसुजा, रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौंसिल सदस्य व मानसिंग बँकेचे संस्थापक जे. के. बापू जाधव, विट्याचे सुरेश पाटील, संभाजीराव पाटील, खेराडे विटयाचे आर. एम. पाटील तसेच कारखान्याचे सर्व खाते प्रमुख, विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी तसेच हितचिंतक उपस्थित होते. कारखान्याचे संचालक प्रल्हाद पाटील यांनी आभार मानले तर, सूत्रसंचालन प्रशासकीय अधिकारी बशीर संदे यांनी केले.