उदगिरी शुगरमध्ये मिल रोलर पूजन

सांगली : जिल्ह्यातील बामणी पारे येथील उदगिरी शुगर अँड पॉवर लि. च्या सन 25-26 गळीत हंगामाच्या मिल रोलरचे पूजन 12 जून 2025 रोजी झाले.
यावेळी कारखान्याचे पूर्णवेळ संचालक चंद्रकांत संपतराव गव्हाणे, चिफ इंजिनियर सतेज पाटील, प्रोडक्शन मॅनेजर निवास पवार, डिस्टलरी मॅनेजर कुलदीप पांढरे तसेच सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उद्योग, शिक्षण, संस्कृती, समाजकारण इ. क्षेत्रातील नामवंत व्यक्तिमत्त्व डॉ. शिवाजीराव कदम यांनी उदगिरी शुगरची स्थापना केली. डॉ. राहुल कदम यांच्या नेतृत्वाखाली हा कारखाना प्रगतीची शिखरे पादाक्रांत करत आहे. सुरुवातीलपासून उसाला एफआरपीपेक्षा अधिक दर देणारा कारखाना म्हणून त्यांनी उदगिरीची ओळख निर्माण केली आहे. यंदाही कारखान्याने एफआरपीपेक्षा अधिक दर आणि तोदेखील वेळेत दिला आहे.