उदगिरी शुगरच्या १ लाख ४० हजार १०१ व्या साखर पोत्याचे पूजन

सांगली : बामणी (पारे) येथील उदगिरी शुगर अँड पॉवर लि. या साखर कारखान्याच्या 1 लाख 40 हजार 101 साखर पोत्याचे पूजन कारखान्याचे चेअरमन डॉ.राहुलदादा कदम यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी सर्व खाते प्रमुख, विभाग प्रमुख उपस्थित होते.

कारखान्याचा गळीत हंगाम जोरात सुरू असून, तब्बल दोन लाख मे. टनांपेक्षा अधिक उसाचे गाळप आतापर्यंत झाले आहे. कारखान्याने सुमारे सात लाख टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे.
उदगिरी शुगरचे संस्थापक डॉ. शिवाजीराव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक डॉ. राहुलदादा कदम यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याने वेगाने प्रगती केली आहे.






