योगी सरकारची ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिवाळी भेट

आवडल्यास ही बातमी शेअर करा

लखनौ : उत्तर प्रदेश मंत्रिमंडळाची बैठक मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी 11 वाजता लोक भवनात झाली. यावेळी नवीन ऊस हंगामासाठी उसाच्या दरात वाढ करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. उसाच्या भावात (एसएपी) प्रति क्विंटल २५ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे नवा ऊस दर, आधी लागवड झालेल्या उसासाठी ३७५ रू. प्रति क्विं. म्हणजेच रू. ३७५० प्रति टन असेल. तर उशिरा लागण झालेल्या उसासाठी रू. ३६०० असेल. मध्यम प्रकारातील लागवडीच्या उसासाठी रू. ३६५० दर राहील.

याबाबतचे वृत्त ‘हिंदी झी न्यूज’ने दिले आहे. मात्र उत्तर प्रदेश सरकारच्या माहिती व जनसंपर्क खात्याच्या संकेतस्थळावर याबाबत उल्लेख आढळला नाही.

उसाला सर्वाधिक दर देण्यात उत्तर प्रदेश, हरियाणा आणि पंजाब या राज्यांमध्ये स्पर्धा चालते. एसएपी (स्टेट ॲडव्हाझसरी प्राईस) पद्धत या राज्यांमध्ये आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात आदी राज्यांमध्ये एसएपी पद्धत नाही.

ऊस व साखर उद्योग, औद्योगिक विकास, गृहनिर्माण विभाग, नगरविकास यासह अनेक विभागांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. यूपी सरकार राज्यासाठी नवीन मोलॅसिस पॉलिसी देखील आणू शकते. स्थानिक मद्य उत्पादक डिस्टिलरींसाठी राखीव असलेल्या मोलॅसिसचा कोटा वाढविण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. औद्योगिक विकास विभागाच्या नवीन परकीय थेट धोरणालाही मंजुरी मिळू शकते. स्वस्त जमिनीसह गुंतवणूकदारांना विविध सुविधा देण्यास मान्यता देण्यात आली आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »