पेठ येथे २८ फेब्रुवारीला ऊस परिषद

आवडल्यास ही बातमी शेअर करा

सांगली : महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघाच्या वतीने आयोजित यंदाची १२ वी ऊस परिषद पेठ येथील जनाई गार्डन (जि. सांगली) येथे येत्या २८ फेब्रुवारी रोजी होणार आहे, अशी माहिती संघाचे संस्थापक अध्यक्ष अतुलनाना माने-पाटील यांनी दिली.

परिषदेचे उद्‌घाटन शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्य केळी उत्पादक संघाचे संस्थापक अध्यक्ष किरणभाऊ चव्हाण असतील. यानिमित्ताने महाऊस प्रदर्शनही आयोजित केले आहे. तसेच ऊसभूषण कार्यगौरव पुरस्कारांचे वितरण होणार आहे, असे माने-पाटील यांनी सांगितले.
कोल्हापूर आणि सांगलीचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनुक्रमे नामदेव परीट, विवेक कुंभार, वाळवा पं.स. कृषी अधिकारी संजय बुवा, संघाचे उपाध्यक्ष सचिन पाटील यांची उपस्थिती आणि मार्गदर्शन यावेळी लाभणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »