शुद्ध व प्रमाणित ऊस बियाणाचा वापर करा : डॉ. विवेक भोईटे

आवडल्यास ही बातमी शेअर करा

सातारा : शेतकऱ्यांनी माती तपासणी करावी आणि जमिनीतील कर्ब वाढवणे आवश्यक आहे याकरिता उसाचे पाचट न जाळता ते जमिनीत मिक्स करावे. ऊस उत्पादन वाढविण्यासाठी शुद्ध व प्रमाणित केलेल्या ऊस बियाणाचा वापर करावा आणि पाण्यासाठी ड्रीपचा वापर करावा, असे आवाहन वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटच्या पिक उत्पादन व संरक्षण विभागाचे प्रमुख डॉ. अशोक कडलग यांनी  केले आहे. सहकार वर्षानिमित्त वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट पुणे आणि ग्रीकल्चर डेव्हल्पमेंट ट्रस्ट, बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.

ऊस पिकाचे उत्पादन वाढून शेतकऱ्यांचे व साखर कारखान्याचे उत्पन्न वाढावे या उद्देशाने अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली हा शेतकरी मेळावा कारखाना कार्यस्थळावर आयोजित केला होता.

या शेतकरी मेळाव्याला ग्रीकल्चर डेव्हल्पमेंट ट्रस्ट, बारामतीचे डॉ. विवेक भोईटे, कारखान्याचे चेअरमन यशवंतराव साळुंखे, माजी चेअरमन सर्जेराव सावंत, रामचंद्र जगदाळे, संचालक, अधिकारी व शेती ऑफिस स्टाफ आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ग्रीकल्चर डेव्हल्पमेंट ट्रस्ट, बारामतीचे डॉ. विवेक भोईटे म्हणाले की, पारंपारिक शेतीला तंत्रानाची जोड दिल्यामुळे निश्चितपणे पिक उत्पादनात वाढ होते. ग्रीकल्चर डेव्हल्पमेंट ट्रस्ट, बारामती यांनी ५ वर्षे संशोधन करुन शेतकऱ्यांच्या शेतामध्ये प्रात्यक्षिक घेवून एआय तंत्रानाच्या वापराने उत्पादनात वाढ होते हे सिध्द केले आहे. एआय तंत्रज्ञानाचा वापर ऊस पिकासह सर्व पिकांच्या उत्पादन वाढीसाठी अत्यंत उपयुक्त आहे. या तंत्रज्ञानाद्वारे वाऱ्याच वेग, पाऊस, प्रकाशाची तीव्रता, जमीनीतील आर्द्रता, पिकास केंव्हा व किती पाणी द्यावे, कोणते खत किती द्यावे, कोणता रोग येण्याची शक्यता आहे, रोग कोणत्या ठिकाणी आला आहे, त्यावर कोणते औषध किती फवारावे, ऊसाची वाढ कशी आहे, ऊस कधी पक्क होईल, किती साखरेचा उतारा मिळेल, किती उत्पादन मिळेल आदी सर्व बाबींची माहिती अगोदरच मिळते. एआय प्रणालीचा वापर करणेसाठी प्रती हेक्टरी रु. २५ हजार खर्च अपेक्षित आहे. यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट, राज्य शासन, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, साखर कारखाने अनुदान देणार असून शेतकऱ्यांनाही त्यांचा हिस्सा भरुन सहभागी व्हावे लागेल. सदर प्रणाली अत्यंत उपयुक्त असल्याने शेतकऱ्यांनी या योजनेमध्ये सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी केले.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »