व. पु. काळे

आवडल्यास ही बातमी शेअर करा

आज बुधवार, मार्च २५, २०२६ युगाब्द : ५१२८
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर चैत्र ४, शके १९४८
सूर्योदय : ०६:३९
सूर्यास्त : १८:५१
चंद्रोदय : ११:३८
चंद्रास्त : ०१:२८, मार्च २६
शक : १९४८
संवत्सर : पराभव
उत्तरायण
ऋतु : वसंत
चंद्र माह : चैत्र
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथि : सप्तमी – १३:५० पर्यंत
नक्षत्र :मृगशीर्ष – १७:३३ पर्यंत
योग : सौभाग्य – ०३:०९, मार्च २६ पर्यंत
करण : वणिज – १३:५० पर्यंत
द्वितीय करण : विष्टि – ००:४७, मार्च २६ पर्यंत
सूर्य राशि :मीन
चंद्र राशि : मिथुन
राहुकाल : १२:४५ ते १४:१६
गुलिक काल : ११:१३ ते १२:४५
यमगण्ड : ०८:१० ते ०९:४२
अभिजित मुहूर्त : कोई नहीं
दुर्मुहूर्त : १२:२० ते १३:०९
अमृत काल : ०९:१९ ते १०:४८
वर्ज्य : ०१:३१, मार्च २६ ते ०३:०२, मार्च २६

लेखक, कादंबरीकार, कथाकथनकार अशी ख्याती असलेल्या व.पु. काळे अर्थात वसंत पुरुषोत्तम काळे हे पेशाने वास्तुविशारद होते.

“आपण सारे अर्जुन”, “गुलमोहर”, “गोष्ट हातातली होती!“, “घर हलवलेली माणसे”, “दोस्त”, “माझं माझ्यापाशी?”, “मी माणूस शोधतोय”, “वन फॉर द रोड”, “रंग मनाचे”, “माणसं”,“प्लेझर बाँक्स भाग १ आणि २”, “वपुर्वाई”, “वपुर्झा़”, “ हुंकार” असे पत्रसंग्रह, व्यक्तीचित्रे, ललितप्रकार खुपच प्रसिध्द आहेत. तसंच “तप्तपदी”, “ठिकरी”, “पार्टनर”, “ही वाट एकटीची” यासारख्या कादंबरी खुपच गाजल्या; व.पु काळेंना “महाराष्ट्र शासनाचा उत्तम लेखकाचा सन्मान”, “पु.भा.भावे पुरस्कार”, “फाय फाउंडेशनाचा पुरस्कार” आणि अमेरिकेत आयोजित करण्यात आलेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद बहाल केले गेले.

१९३२: लेखक व कथाकथनकार वसंत पुरुषोत्तम ऊर्फ व. पु. काळे यांचा जन्म. (मृत्यू: २६ जून २००१)

भारतातील आघाडीचे शास्त्रज्ञ डॉ. वसंत गोवारीकर – अवकाश, हवामान शास्त्र आणि लोकसंख्या या क्षेत्रात संशोधन करुन अमूल्य योगदान देणारे ज्येष्ठ भारतीय शास्त्रज्ञ डॉ. वसंत गोवारीकर हे देशातील मूलभूत समस्यांची जाण असलेले आणि त्यांवर उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करणारे शास्त्रज्ञ होते. भारत संपूर्ण साक्षर होण्याची गरज आहे व सर्वांना पुरून उरेल एवढी उर्जा निर्माण करायला हवी असे म्हणणा-या गोवारीकर यांनी कल्पनेतला प्रगत भारत प्रत्यक्षात यावा म्हणून शास्त्रज्ञाच्या रुपात मोठे योगदान दिले.

गोवारीकरांचे शालेय शिक्षण कोल्हापुरातल्या हरिहर विद्यालय व सिटी हायस्कूल या शाळांत झाले. कोल्हापुरातल्या राजाराम कॉलेजातून त्यांनी बी.एस्सी.आणि सैद्धान्तिक भौतिकीमध्ये एम्.एस्सी. पूर्ण केले . रसायन अभियांत्रिकीचे शिक्षण घेण्यासाठी ते लंडनला रवाना झाले. १९५९ ते १९६७ या काळात लंडनमधील बर्मिंगहॅम विद्यापीठातून त्यांनी त्या विषयातील मास्टर्स आणि डॉक्टरेट या पदव्या प्राप्त केल्या.

त्यानंतर प्रथम त्यांनी हार्व्हेल येथील अॅटॉमिक एनर्जी रिसर्च एस्टॅब्लिशमेंटमध्ये आणि नंतर ब्रिटिश मिनिस्ट्री ऑफ एव्हिएशनच्या समरफील्ड रिसर्च स्टेशन येथे, संशोधन केले. त्याच दरम्यान डॉ. गोवारीकर यांनी ऑक्सफर्ड आणि केंब्रिज विद्यापीठांच्या काही परीक्षांसाठी बाह्य-परीक्षक म्हणून काम पाहिले आणि परगॅमॉनच्या संपादक मंडळाचे सदस्य या नात्याने अनेक वैज्ञानिक पुस्तकांचे संपादनही केले.
वयाच्या २८व्या वर्षी केंब्रिज, ऑक्सफर्डमध्ये डॉक्टरेटसाठी परीक्षक म्हणून त्यांची नियुक्ती झाली आणि पुढे अमेरिकेत समरफिल्ड रिसर्च सेंटरमध्ये क्षेपणास्त्रातील मीटरचे संशोधन करण्यासाठी त्यांना सन्मानाने बोलवून घेण्यात आले.

टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च या संस्थेमध्ये १९६५ पासून डॉ. गोवारीकर विक्रम साराभाई यांच्यासोबत उपग्रह तंत्रज्ञानावर काम करू लागले. त्याचे फलित म्हणजे पॉलिमर केमिस्ट्रीमध्ये आज ते अव्वल समजले जातात. ते नंतर त्रिवेंद्रमला थुंबा येथील अवकाश संशोधन प्रयोगशाळेचे प्रमुख झाले. या सर्व श्रमाचे सार्थक म्हणजे १७ एप्रिल, १९८३ रोजी त्यांच्या नेतृत्वाखाली एस.एल.व्ही.-३ हा उपग्रह वाहक कार्यान्वित झाला व तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी त्यांची पाठ थोपटली.
इ.स. १९९१ ते इ.स. १९९३ या काळात भारताच्या पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार होते. वसंत गोवारीकर इ.स. १९९४ ते इ.स. २००० या काळात मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष होते. ते ज्ञान प्रबोधिनी संस्थेशी दीर्घ काळ निगडित होते. हराळी येथील ज्ञान प्रबोधिनीच्या शाळेतील विज्ञान प्रयोगशाळेला डॉ. गोवारीकरांचे नाव देण्यात आले आहे.

१९३३: पद्मभूषण पुरस्कार सन्मानित शास्त्रज्ञ वसंत गोवारीकर यांचा जन्म. ( मृत्यू : २ जानेवारी, २०१५)

  • घटना :
    १६५५: क्रिस्टियन हायगेन्स यांनी शनिच्या टायटन या सर्वात मोठया उपग्रहाचा शोध लावला.
    १८०७: गुलाम व्यापार कायदा करून ब्रिटिश साम्राज्य मध्ये गुलामांचा व्यापार बंद करण्यात आला.
    १८९८: शिवरामपंत परांजपे यांचे काळ हे साप्ताहिक सुरू झाले.
    २०००: १७ वर्षीय जलतरणपटू रुपाली रेपाळे हिने दक्षिण आफ़्रिकेतील रॉबेन आयलंड खाडी पोहून पार केली. ही खाडी पोहणारी ती वयाने सर्वात लहान जलतरणपटू आहे.

• मृत्यू :

• १९३१: भारतीय पत्रकार आणि राजकारणी गणेश शंकर विद्यार्थी यांचे निधन. (जन्म: २६ ऑक्टोबर, १८९०)
• १९४०: आसामी कादंबरीकार उपन्यास सम्राट रजनीकांत बर्दोलोई यांचे निधन. (जन्म: ११ डिसेंबर, १८६७)
• १९९१: जयपूर-अत्रौली घराण्याचे गायक वामनराव सडोलीकर यांचे निधन. (जन्म: १६ सप्टेंबर , १९०७)
• १९९३: साहित्यिक मधुकर केचे यांचे निधन. (जन्म: १७ जानेवारी, १९३२)

  • जन्म :
    १९१६ : व्यासंगी, अद्भूत व वास्तववादी चित्रकार साबानंद मोनप्पा उर्फ एस. एम. पंडित यांचा जन्म ( मृत्यू : ३० मार्च १९९३)
    १९४५ : भाषातज्ज्ञ, कोशकार आणि अनुवादक सत्त्वशीला विठ्ठल सामंत यांचा जन्म त्यांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार आणि होमी भाभा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. ( मृत्यू : १ मे २०१३ )
    १९५६: ग्वाल्हेर घराण्याचे गायक मुकूल शिवपुत्र यांचा जन्म.
आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »