वाढदिवस विशेष

पद्मभूषण, क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांचा समृद्ध वारसा अधिक समृद्ध करत नेटाने पुढे चालवणारे हुतात्मा परिवाराचे नेतृत्व म्हणजे अण्णांचे सुपुत्र श्री. वैभवकाका नायकवडी.
स्व. अण्णांनी लावलेला विकासाचा आणि सामाजिक समरसतेचा वटवृक्षाचे , महाकार्य वृक्षात रूपांतर करून त्याच्या सावलीचा हजारो सर्वसामान्यांना दिलासा देणारे व्यक्तिमत्व म्हणजे वैभवकाका. त्यांनी विकसित केलेला हुतात्मा पॅटर्न सहकार आणि विकासासाठी आदर्श गणला गेला आहे.
त्यांनी अल्पावधीतच लोकांच्या मनात विश्वास, आपुलकी आणि विकासाची नवी भावना निर्माण केली आहे.
लोकसहभागावर निस्सीम श्रृद्धा असणाऱ्या वैभव काकांचा समाजातील सर्व घटकांना एकत्र घेऊन चालण्याचा स्वभाव त्यांचे वेगळेपण अधिक ठळकपणे अधोरेखित करतो . शिक्षण, ग्रामीण विकास, शेती आणि सहकार या क्षेत्रांत त्यांनी जे उपक्रम राबवले त्याला तोड नाही.
आपला वाळवा तालुका असो की, सांगली जिल्ह्याची सर्वांगीण प्रगती.. ते सातत्याने प्रयत्न करत आले आहेत. दुग्धविकास, अन्नप्रक्रिया, औद्योगिक विकास, महिला सक्षमीकरण अशा अनेक विषयांवर चौफेर काम करताना, युवकांचा सहभाग कसा वाढेल यावरही त्यांचा कटाक्ष असतो.
त्यांनी निर्माण केलेल्या हुतात्मा पॅटर्नचा लोकसहभाग आणि जनविश्वास हा आत्मा आहे, तर पारदर्शकता हे प्रमुख तत्त्व आहे. त्यामुळेच एवढ्या प्रदीर्घ कालखंडानंतरही त्यांचावरील लोकविश्वास अधिक भक्कम होत आहे.
अशा या लोकनेत्यास ‘शुगरटुडे’च्या वतीने वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा!






