‘वैद्यनाथ’ची निवडणूक बिनविरोध

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पंकजा मुंडे, यशश्री मुंडे यांच्यास २१ उमेदवार बिनविरोध

परळी : लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांनी स्थापन केलेल्या पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदाची निवडणूक अखेर बिनविरोध झाली.

माजी चेअरमन तथा भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, भगिनी अॅड. यशश्री मुंडे यांच्यास २१ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. आमदार धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यामध्ये ‘सेटलमेंट’ झाल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली. त्याबद्दल पंकजा मुंडे म्हणाल्या, की राजकारण बाजूला ठेवून कारखान्याच्या हितासाठी आम्ही आणि धनंजय यांनी बिनविरोधचा निर्णय घेतला, त्यामुळे नवा पायंडा पडेल.

कारखान्याच्या संचालकपदाच्या २१ जागांसाठी ९ मे रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला व ११ जून रोजी मतदान घेण्याचे ठरले होते. ५० जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. अर्ज छाननी प्रक्रियेत १३ उमेदवारांचे अर्ज नामंजूर झाले. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे १ जूनपर्यंत या निवडणुकीतून खा. प्रीतम मुंडे यांच्यासह १६ जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे उर्वरित २१ उमेदवार बिनविरोध निवडून आले.

या कारखान्यासाठी आमदार धनंजय मुंडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला नव्हता. बिनविरोध निवडून आलेल्यांमध्ये पंकजा मुंडे, यशश्री मुंडे, केशवराव माळी, वाल्मिक कराड, श्रीहरी मुंडे, रेशीम कावळे, ज्ञानोबा मुंडे, राजेश गीते, सतीश मुंडे, अजय मुंडे, पांडुरंग फड, हरिभाऊ गुट्टे, सचिन दरक, सुरेश माने, वसंत राठोड, चंद्रकेतू कराड, शिवाजीराव गुट्टे, शिवाजी मोरे, सुधाकर सिनगारे, सत्यभामा उत्तमराव आघाव, मंचक घोबाळे यांचा समावेश आहे.

सध्या हा कारखाना बंद असून, मोठ्या आर्थिक संकटात आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »