सदगुरू वामनराव पै

आवडल्यास ही बातमी शेअर करा


आज मंगळवार, ऑक्टोबर २१, २०२५ युगाब्द : ५१२७
भारतीय राष्ट्रीय सौर अश्विन दिनांक २९, शके १९४७
सूर्योदय : ०६:३४ सूर्यास्त : १८:११
चंद्रोदय : चंद्रोदय नहीं चंद्रास्त : १७:५८
शालिवाहन शक : संवत् : १९४७
संवत्सर : विश्वावसू
दक्षिणायन
ऋतु : शरद्
चंद्र माह : आश्विन
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथि : अमावस्या – १७:५४ पर्यंत
नक्षत्र : चित्रा – २२:५९ पर्यंत
योग : विष्कम्भ – २७:१७+ पर्यंत
करण : नाग – १७:५४ पर्यंत
द्वितीय करण : किंस्तुघ्न – पूर्ण रात्रि पर्यंत
सूर्य राशि : तूळ
चंद्र राशि : कन्या – ०९:३६ पर्यंत
राहुकाल : १५:१७ ते १६:४४
गुलिक काल : १२:२३ ते १३:५०
यमगण्ड०९:२९ ते १०:५६
अभिजित मुहूर्त : १२:०० ते १२:४६
दुर्मुहूर्त : ०८:५४ ते ०९:४०
दुर्मुहूर्त : २३:०९ ते २३:५८
अमृत काल :१५:५१ ते १७:३८
वर्ज्य : २९:१५+ ते ०७:०२ on ऑक्टोबर २२

श्री लक्ष्मीकुबेर पूजन आणि श्री लक्ष्मीकुबेराचे ध्यान करावे

। ध्यायामि तां महालक्ष्मीं कर्पूरक्षोदपाण्डुराम् ।
शुभ्रवस्त्रपरीधानां मुक्ताभरणभूषिताम् ।।
पङ्कजासनसंस्थानां स्मेराननसरोरुहाम् ।
शारदेन्दुकलाकान्तिं स्निग्धनेत्रां चतुर्भुजाम् ।।
पद्मयुग्माभयवरव्यग्रचारुकराम्बुजाम् ।
अभितो गजयुग्मेन सिच्यमानां कराम्बुना ।।

समृद्धी आणि ऐश्वर्य यांचे प्रतीक असलेल्या लक्ष्मीची पूजा या रात्री केली जाते.

श्री लक्ष्मीपूजनाच्या वेळी अक्षतांनी बनवलेले अष्टदल कमल किंवा स्वस्तिक यांवरच श्री लक्ष्मीची स्थापना केली जाते. त्यानंतर लक्ष्म्यादी देवतांना लवंग, वेलची आणि साखर घालून तयार केलेल्या गायीच्या दुधाच्या खव्याचा नैवेद्य दाखवतात. धने, गूळ, साळीच्या लाह्या, बत्तासे इत्यादी पदार्थ लक्ष्मीला वाहून नंतर ते आप्तेष्टांना वाटतात. याखेरीज चलनी नोटा, नाणी, सोन्याचे अलंकार यांचीही पूजा यावेळी केली जाते. व्यापारी वर्गात यापूजेच्या वेळी फटाके उडवून आनंद साजरा केला जातो.

आज लक्ष्मी पूजन आहे.

आश्विन वद्य अमावस्येच्या मध्यरात्री भगवान महावीरांना राजगृहाजवळील पावा वा पावापुरी येथे निर्वाण प्राप्त झाले. हा दिवस जैन लोक दिवाळी म्हणून साजरा करतात. त्यांच्या निर्वाणानंतर कार्तिक शुद्ध प्रतिपदेपासून वीर संवताला सुरुवात झाली.

या दिवशी जैन मंदिरात भगवान महावीरांच्या प्रतिमेसमोर पूजा केली जाते. ‘निर्वाण लाडू’ अर्पण करण्याची प्रथा आहे. हा दिवस जैन आणि हिंदू कॅलेंडरमधील वर्षाचा शेवटचा दिवस मानला जातो.

त्यांच्या शिकवणी, जसे की अहिंसा, सत्य, अस्तेय (चोरी न करणे), अपरिग्रह (लोभ नसणे) आणि ब्रह्मचर्य यावर आधारित आचरण केले जाते.

आज भगवान महावीर निर्वाण दिन आहे.

अखंड देशासाठी त्यागाची भावना ठेवून कर्तव्यावर असलेले देशातील अनेक जवान शहिद होत असतात. त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ २१ ऑक्टोबर हा दिवस पोलीस हुतात्मा स्मृती दिन म्हणून पाळला जातो.

अशा कर्तव्य निष्ठ शहिदांना विनम्र अभिवादन.

आज भारतीय पोलीस स्मृती दिन आहे.

तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार”* हा मंत्र सर्वदूर पोहोचवणारे सतगुरु श्री वामनराव पै… हे विद्वान तत्वज्ञानी आणि अभिनव जीवनविद्या तत्वज्ञानाचे संस्थापक होते. त्यांचा जन्म मुंबई, भारत येथे २१ ऑक्टोबर १९२३ रोजी एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांनी १९४४ मध्ये मुंबई विद्यापीठ, महाराष्ट्र, भारतातून अर्थशास्त्र विषयात पदवी संपादन केली. जीवनविद्येसह त्यांचे जीवन ध्येय साकारण्यापूर्वी, सतगुरु महाराष्ट्र राज्य सरकारमध्ये नोकरीला होते, आणि ते १९८१ मध्ये वित्त उपसचिव म्हणून सेवानिवृत्त झाले.

वयाच्या २५ व्या वर्षी सतगुरु श्री वामनराव पै यांना त्यांचे गुरु श्री नाना महाराज श्रीगोंदेकर यांच्याकडून अध्यात्मवादाची दीक्षा मिळाली. सतगुरुंनी त्यांच्या समर्पित आणि अथक प्रयत्नांनी आध्यात्मिक साधनेचे (आत्म-साक्षात्कार) सर्वोच्च ध्येय गाठले. त्यांनी अवर्णनीय आनंद आणि समाधान अनुभवले, ज्यामुळे त्यांना १९५२ मध्ये लोकांपर्यंत आध्यात्मिक ज्ञान आणि आनंद पसरवण्यास प्रवृत्त केले.

आपल्या आध्यात्मिक ज्ञानाचा मानवी दु:ख दूर करण्यासाठी सतगुरुंच्या सखोल संकल्पामुळे त्यांनी जीवनविद्येचे अभिनव तत्त्वज्ञान शोधून काढले. हे तत्त्वज्ञान जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात, प्रत्येक टप्प्यावर लाखो लोकांना उपयुक्त ठरले आहे. ‘तुम्ही तुमच्या नशिबाचे शिल्पकार आहात’ या त्यांच्या क्रांतिकारी तत्त्वाने लाखो लोकांना यश, समृद्धी आणि आनंदाने परिपूर्ण जीवन जगण्याची प्रेरणा दिली आहे.

सतगुरु श्री वामनराव पै यांनी त्यांच्या हयातीत संपूर्ण भारत आणि युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका (यूएसए) मध्ये जीवनविद्या तत्त्वज्ञानावर 10,000 हून अधिक व्याख्याने दिली आहेत.

त्यांनी लिहिलेल्या २७ पुस्तकांमधून कोणीही त्यांच्या विचारांचे आणि शब्दांचे देवत्व आणि खोली पाहू शकतो.

१९२२ : विद्वान तत्वज्ञानी आणि अभिनव जीवनविद्या तत्वज्ञानाचे संस्थापक सतगुरु श्री वामनराव पै यांचा जन्म ( मृत्यू : २९ मे, २०१२ )

धर्मभास्कर – गंगाधर नारायण कोपरकर यांचा जन्म भिवंडी येथे झाला. नारायण आणि सरस्वती यांचा हा जेष्ठ पुत्र. वडील भिवंडी येथील दत्तमंदिराचे पुजारी. आत्यंतिक गरिबी. पण पुढे शिकण्याची जबरदस्त इच्छा होती. ७ वी झाल्यानंतर ते पुण्यात आले.
ते एक नामवंत गायक होण्यासाठी. पुण्याच्या पत्र्यामारूतीच्या मंदिरात राहून १० घरी माधुकरी मागून त्यांनी गांधर्व महाविद्यालयात प्रवेश मिळविला. पण त्यांच्याकडे फीचेही पैसे नव्हते म्हणून शेण आणून महाविद्यालयातील जमीन दर आठ दिवसाला सारवून फी चे ३ रु. महिना त्यांनी भरून दिले. संगीत विशारदपर्यंत संगीताचे शिक्षण घेऊन ख्याल गायकीपर्यंत संगीतविद्या आत्मसात केली. नंतर प्रसिद्ध कीर्तनकार भिलवडीकर शास्त्री यांच्या घरी राहून कीर्तन, संस्कृत व वेदांत तत्त्वज्ञान यांचा अभ्यास केला. तसेच हरि कीर्तनोत्तेजक पाठशाळा येथेही कीर्तनाचे शिक्षण घेऊन कीर्तनाचा सखोल अभ्यास करून ‘कीर्तनशलाका’ ही पदवी प्राप्त करून ते प्रसिद्ध कीर्तनकार बनले.

आजपर्यंतच्या क्षणापर्यंत ‘कीर्तनशलाका’ ही पदवी मिळविणारे ते एकमेव कीर्तनकार आहेत.
याच कालावधीत त्यांनी एक वर्षात ३ इंग्रजी इयत्ता करुन मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण करुन बी.ए. ऑनर्सपर्यंत महाविद्यालयाचे शिक्षण त्यांनी पूर्ण केले. प्रपंच चालविण्यासाठी गुजराथी हायस्कूलमध्ये संस्कृत शिक्षक म्हणून नोकरी केली. त्यासाठी त्यांनी संस्कृतची ‘काव्यतीर्थ’ ही परीक्षा दिली. या गुजराथी हायस्कूलमध्ये नोकरी करतानाच गुजराथी भाषा आत्मसात केली.

नोकरी सोडताना त्यांनी मराठी, इंग्रजी, हिंदी, संस्कृत व गुजराथी भाषा बोलता येत होत्या.
कीर्तनाद्वारा प्रचारकार्य चालू असतानाच त्यांनी कीर्तनकारांची संघटना करण्याचा प्रयत्न केला आणि त्यासाठी पहिले कीर्तनसंमेलन गोवा राज्यात १९७६ मध्ये झाले. तिथेच कीर्तन महाविद्यालयाची घोषणा झाली व १९७७ पुण्यात कीर्तन महाविद्यालय सुरु झाले.
याच उपक्रमाबरोबर परदेशात कीर्तनकार पाठविण्याची योजना आखून १२ कीर्तनकार परदेशी पाठवून अमेरिका, इंग्लंड, आफ्रिका देशात कीर्तनाद्वारा धर्मपताका फडकाविली. हा एक नवीन विक्रम करताना कीर्तनकारांना हिंदी, इंग्रजी, गुजराथीमधून कीर्तने तयार करुन कीर्तने त्यांनी बसवून घेतली. कीर्तनकार कसा असावा याविषयी त्यांची काही मते होती. कीर्तनकार पदवीधर असावा, त्याला कमीत कमी संस्कृत, हिंदी, इंग्रजी भाषा यायलाच पाहिजेत व या भाषेतील वचनांचा त्यांनी मराठी बरोबर उपयोग करावा. पाश्चात्यांचे दाखले दिल्याने, आपले बोलणे वजनदार होते.

कीर्तनकलेला दर्जा प्राप्त करुन देण्यासाठी सरकार दरबारी मानन्मान मिळावा यासाठी त्यांनी प्रयत्न केले. राज्यशासनाचा पुरस्कार पहिला पुरस्कार धर्मभास्कर कोपरकरांनाच मिळाला. कीर्तनकारांना स्थैर्य प्राप्त व्हावे म्हणून कीर्तनकला व तिचे महत्त्व शासनाला पटवून देऊन आज वृद्ध कीर्तनकारांना कलाकार पेन्शन मिळू लागले आहे. त्या उपक्रमासाठी ९९ पुस्तके लिहिली व काही वर्षे ‘भारतीय वाङ्मयमाला’ ही मासिक वार्तापत्रिका चालविली व त्याद्वारा घरी बसून हजारो घरात जनजागरण व ज्ञानदानाने समाज प्रबोधन केले. याच वार्तापत्रिकेतून वनौषधी, गोवंश महत्त्व, तुलसीमहत्त्व, ऋषीतत्त्व राजकारण विषय हाताळले व ते लोकांपर्यंत पोचविले.

१९२०: ‘कीर्तनशलाका’ ही पदवी मिळविणारे एकमेव कीर्तनकार धर्मभास्कर गं. ना. कोपरकर यांचा जन्म. (मृत्यू: २३ एप्रिल २००१ )

  • घटना :

१८५४: फ्लोरेन्स नायटिंगेल आणि इतर ३८ नर्सेसना क्रिमीयन युद्धात वैद्यकीय सेवेसाठी पाठवण्यात आले.
१८७९: थॉमस एडीस यांनी दिव्यांच्या प्रकाशाच्या डिझाइनसाठी पेटंट दाखल केले.
१८८८: स्वीस सोशल डेमोक्रेटिक पार्टी सुरु झाली.
१९३४: जयप्रकाश नारायण यांनी काँग्रेस सोशालिस्ट पार्टी ची स्थापना केली.
१९४३: सिंगापूर येथे आझाद हिन्द सेनेची स्थापना.
१९४३: सुभाष चंद्र बोस यांनी स्वतंत्र भारत सरकारची औपचारिक घोषणा केली.
१९४५: फ्रान्समधे स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळाला.
१९५१: डॉ. शामाप्रसाद मुकर्जी यांनी दिल्ली येथे भारतीय जनसंघ या पक्षाची स्थापना केली.
१९८३: प्रकाशाने निर्वातात १/२९९७९२४५८ सेकंदात कापलेले अंतर अशी १ मीटरची व्याख्या ठरवली गेली.
१९८७: भारतीय शांतिसेनेने (IPKF) जाफनातील एका रुग्णालयावर केलेल्या हल्ल्यात ७० तामिळ ठार झाले.
१९८९: जनरल अरुणकुमार वैद्य यांचे मारेकरी सुखदेवसिंग आणि हरविंदरसिंग यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.
१९९९: चित्रपट निर्माते बी. आर. चोप्रा यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.

• मृत्यू :

• १८३५: तामिळ कवी व संगीतकार मुथुस्वामी दीक्षीतार यांचे निधन. (जन्म: २४ मार्च, १७७५)
• १९८१: ज्ञानपीठ पारितोषिक विजेते कन्नड कवी दत्तात्रय रामचंद्र बेन्द्रे यांचे निधन. (जन्म: ३१ जानेवारी१८९६ – धारवाड, कर्नाटक)
• १९९०: भारतीय तत्त्ववेत्ता आणि लेखक प्रभात रंजन सरकार यांचे निधन. (जन्म: २१ मे, १९२१)
• २०१०: भारतीय कवी आणि अनुवादक अ. अय्यप्पन यांचे निधन. (जन्म: २७ ऑक्टोबर १९४९)
• २०१२: चित्रपट दिग्दर्शक, पटकथालेखक आणि निर्माते यश चोप्रा यांचे निधन. (जन्म: २७ सप्टेंबर, १९३२)

  • जन्म :

१८८७: भारतीय वकील आणि राजकारणी कृष्णा सिंह यांचा जन्म. (मृत्यू: ३१ जानेवारी, १९६१)
१९१७: गायक व संगीतकार राम फाटक यांचा जन्म. (मृत्यू: २६ सप्टेंबर, २००२)
१९२०: ‘कीर्तनशलाका’ ही पदवी मिळविणारे ते एकमेव कीर्तनकार धर्मभास्कर गं. ना. कोपरकर यांचा जन्म. (मृत्यू: २३ एप्रिल २००१ )
१९३१: हिन्दी चित्रपट अभिनेते व निर्माते शम्मी कपूर यांचा जन्म. (मृत्यू: १४ ऑगस्ट, २०११)

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »