वसंत साखर कारखाना लवकरच सुरू होणार
यवतमाळ – जिल्ह्यातील पोफाळी येथे स्थित वसंत साखर कारखाना लवकरच सुरू होणार आहे. यामुळे आजूबाजूच्या पाच तालुक्यातील ऊस उत्पादकांना दिलासा मिळणार आहे.
हा कारखाना खासदार हेमंत पाटील यांनी पंधरा वर्षासाठी भाडेतत्त्वावर चालवायला घेतला आहे. अशा परिस्थितीत कारखाना चालवण्यासाठी वेगवेगळ्या पदांची आवश्यकता असून या पदांची भरती सुरू झाली आहे. यासाठी नांदेड येथे मुलाखती घेण्यात आल्या आहेत. यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील तसेच आजूबाजूच्या पंचक्रोशीतील 30 किलोमीटर अंतरावरील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
गेली पाच वर्षे हा कारखाना बंद असल्याने परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना नाईलाजाने दुसरी पिके घ्यावी लागत होती. विशेष म्हणजे कारखाना बंद असल्याने पंचक्रोशीतील छोटी मोठी कृषी आधारित व्यवसाय बंद झाली होती. मात्र आता पुन्हा एकदा परिसरात शेतकरी मोठ्या प्रमाणात ऊस लागवड करणार आहेत.
वसंत कारखान्यासाठी आवश्यक चीफ इंजिनिअर, चीफ केमिस्ट, सुरक्षारक्षक चालक इत्यादी पदांच्या मुलाखती पार पडल्या आहेत.