वसंतदादा कारखान्याची निवडणूक बिनविरोध

आवडल्यास ही बातमी शेअर करा

१९ नवे चेहरे, दादांची चौथी पिढी हर्षवर्धन पाटलांच्या रूपाने राजकारणात

सांगली : येथील वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणुकीत मंगळवारी, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी २१ जागांसाठी २१ अर्जच शिल्लक राहिल्याने निवडणूक बिनविरोध झाल्याचे घोषित करण्यात आले.

नव्या संचालक मंडळात खासदार विशाल पाटील, माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांचे चिरंजीव हषवर्धन पाटील, अमित पाटील आदी संचालकांचा समावेश आहे. हर्षवर्धन यांच्या रूपाने दादांची चौथी पिढी आता राजकारणात उतरली आहे. कोल्हापूर विभागाचे प्रादेशिक उपसंचालक (साखर) गोपाळ मावळे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.

‘वसंतदादा ‘चो पंचवार्षिक निवडणूक अखेरच्या क्षणी निवडणूक बिनविरोध करण्यात खासदार विशाल पाटील यांना यश आले. माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांचे चिरंजीव हर्षवर्धन पाटील यांचा कारखान्याच्या संचालकाच्या रुपाने प्रवेश झाल्याने वसंतदादा घराण्याची चौथी पिढी आता राजकारणात सक्रिय झाली आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून गोपाळ मावळे यांनी सहकारी विजय पाटील, दिवाकर पाटील यांनी सहकार्य केले. वसंतदादा शेतकरी साखर कारखान्याचे ३६ हजार सभासद आहेत. कारखान्याच्या २१ जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम सुरू होता. यामध्ये सांगली, मिरज, आष्टा, भिलवडी, तासगाव या पाच गटांतून प्रत्येकी तीनप्रमाणे पंधरा तर बिगर उत्पादक सहकारी संस्था व पणन संस्था सभासद मतदासंघातून दोन, अनुसूचित जाती किंवा जमातीचा एक, भटक्या विमुक्त जाती व जमाती, विशेष मागास प्रवर्ग गटातून एक, तर महिला गटातून दोन असे २१ संचालक निवडणूक द्यायचे होते. त्यासाठी १४४ अर्ज दाखल झाले होते.

उमेदवारी अर्ज छाननीत ५ अर्ज बाद ठरले, १३९ जणांपैकी सोमवार अखेर १३ जणांनी माघार घेतली. शेवटच्या दिवशी १२६ पैकी १०५ उमेदवारांनी माघार घेतली.


बिनविरोध संचालक:
उत्पादक सह. संस्थाः खासदार विशाल पाटील (सांगली). उत्पादक गट सांगली – बाळासाहेब पाटील (कळंबी), दिनकर साळुंखे (माधवनगर), हर्षवर्धन पाटील (सांगली),
मिरज गटः दौलतराव शिंदे (म्हैसाळ), शिवाजी कदम (शिरखोण), तानाजी पाटील (खंडेराजुरी),
आष्टा गट- संजय पाटील (कवठेपिरान), ऋतुराज सूर्यवंशी (अंकलखोप), विशाल चौगुले (कसबेडिप्रज)
भिलवडी गट – यशवंतराव पाटील, गणपतराव सावंत पाटील (सावंतपूर), अमित पाटील (येळावी), तासगाव गट अंकुश पाटील (बोरगाव), उमेश मोहिते (मांजर्डे), गजानन खुजट (तासगाव).
अनुसूचित जाती-जमाती विशाल चंदरकर (कवठेएकंद), महिला गट-सुमित्रा खोत (हरिपूर) व शोभा पाटील (म्हैसाळ).
इतर मागासवर्गीय अंजूम महात (सांगली). भटक्या-विमुक्त जाती व जमाती प्रल्हाद गडदे (ब्रह्मनाळ).

संचालक मंडळात १९ नवे चेहरे…
वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत या वर्षों विद्यमान अध्यक्ष खासदार विशाल पाटील यांनी नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार २१ संचालकांपैकी १९ हे नवे चेहरे आहेत. सर्वांत तरुण चेहरा म्हणून प्रतीक पाटील यांचे सुपुत्र हर्षवर्धन पाटील असणार आहेत. खासदार विशाल पाटील, तर त्यांचे मावस बंधू अमित पाटील हे दोनच जुने चेहरे आहेत.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »