वसुबारस

आवडल्यास ही बातमी शेअर करा

आज सोमवार, ऑक्टोबर २८, २०२४ युगाब्द : ५१२६
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर कार्तिक ६, शके १९४६
आजचे पंचांग
सूर्योदय : ०६:३७ सूर्यास्त : १८:०७
चंद्रोदय : ०३:५५, ऑक्टोबर २९ चंद्रास्त : १५:४५
शक सम्वत : १९४६
संवत्सर : क्रोधी
दक्षिणायन
ऋतु : शरद
चंद्र माह : आश्विन
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथि : एकादशी – ०७:५० पर्यंत
नक्षत्र : पूर्वाफाल्गुनी – १५:२४ पर्यंत
योग : ब्रह्म – ०६:४८ पर्यंत
करण : बालव – ०७:५० पर्यंत
द्वितीय करण : कौलव – २१:१० पर्यंत
सूर्य राशि : तूळ
चंद्र राशि : सिंह – २२:११ पर्यंत
राहुकाल : ०८:०३ ते ०९:३०
गुलिक काल : १३:४८ ते १५:१४
यमगण्ड : १०:५६ ते १२:२२
अभिजितमुहूर्त : ११:५९ ते १२:४५
दुर्मुहूर्त : १२:४५ ते १३:३१
दुर्मुहूर्त : १५:०३ ते १५:४९
अमृत काल : ०८:१२ ते १०:००
वर्ज्य : २३:३३ ते ०१:२१, ऑक्टोबर २९

॥ अश्विन वद्य द्वादशी । नक्षत्र मृगराज परियेसी ॥ श्रीगुरु बैसले निजानंदेेसी । अदृश्य झाले गंगेत ॥
॥ लौकिकी दिसती अदृश्य । आपण कुरवपुरी असती जण।। श्रीपाद राव निर्धारी जाण। त्रिमूर्तींचा अवतार ।।

आज गुरुद्वादशी आहे. – श्रीपाद श्रीवल्लभ यांनी निजानंदी गमन केले तो दिवस

मी वत्स माझी गायी । न ये आतां करं काई ॽ॥
मज पाडसाची माय । भक्ति वत्साची ते गाय ॥

  • संत जनाबाईं
  • वसुबारस – आपल्याला दूध देऊन आपले पोषण करणार्या या गोमातेबद्दल कृतज्ञता म्हणून हा दिवस साजरा केला जातो.

या दिवशी गोधनाची पूजा केली जाते. समुद्रमंथनाच्या वेळेस पाच कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या त्यापैकी नंदा नामक धेनूस उद्देशून हे व्रत केले जाते. या दिवशी अनेक जन्मांच्या कामना पूर्ण व्हाव्यात याकरिता वासरासहित गायीची पूजा केली जाते. ह्या दिवसापासून घरासमोर रांगोळी काढण्यास सुरुवात करतात. काही स्त्रियांचा या दिवशी उपवास असतो. ह्या दिवशी गहू, मूग खात नाहीत. स्त्रिया बाजरीची भाकरी व गवारीच्या शेंगाची भाजी खाऊन उपवास सोडतात. भरपूर कृषी उत्पादन व्हावे, आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा करतात.

आज वसुबारस आहे.

दि. २८ ऑक्टोबर, १८९२ या दिवशी पॅरिसमध्ये ग्रेव्हीन म्युझियममध्ये चार्ल्स इमाईल रेनॉड्स यांच्या, जगातल्या पहिल्याच, अॅनिमेशनपटाचे ऐतिहासिक प्रदर्शन . द असोसिएशन ऑफ इंटरनॅशनल फिल्म्स द अॅनिमेशन’ म्हणजेच ‘असिफा’ या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या पुढाकाराने २८ ऑक्टोबर हा दिवस दरवर्षी ‘आंतरराष्ट्रीय अॅनिमेशन दिन’ म्हणून जगभर साजरा केला जातो. यानिमित्त जगभर विविध उपक्रम आयोजित केले जातात.

भारतात अॅनिमेशन उद्योगाची सुरुवात १९५६ साली झाली. त्यावेळी भारत आणि अमेरिका दरम्यान सांस्कृतिक देवाण-घेवाण कार्यक्रमांतर्गत वॉल्ट डिस्ने स्टुडीओचे क्लेअर विक्स यांच्या मार्गदर्शनाखाली भारत सरकारच्या फिल्म्स डिव्हीजन्सचे कार्टून फिल्म युनिट सुरु झाले. सामाजिक संदेश देण्याकरिता अॅनिमेशन कलेचा वापर फिल्म्स डिव्हीजन्सने मोठ्या प्रमाणात केला. भारतातील अॅनिमेशन उद्योगाचे प्रवर्तक राम मोहन यांना सन २०१४ मध्ये प्रतिष्ठेच्या ‘पद्मश्री’ पुरस्कारानेही गौरवण्यात आले आहे. अमेरिकेतील विख्यात कार्टून स्टुडिओ वॉल्ट डिस्ने यांचे मोठे योगदान लाभल्याने हा उद्योग जगभर लोकप्रिय झाला. त्याव्यतिरिक्त जॉर्ज लुकास, जॉन लिसेस्टर, स्टीव जॉब्ज, स्टीव्हन स्पीलबर्ग यासारख्या प्रज्ञावान आणि प्रतिभावान दिग्गजांनी विविध प्रयोगाअंती पडद्यावर आभासी जग निर्माण केलं. अॅनिमेशन तंत्र हाच त्यांचा प्रयोगाचा आत्मा होता. मूळ कल्पनाचित्रं रेखाटल्यावर, सिनेमा माध्यमातून पडद्यावर दृकश्राव्य परिणाम साधणे, हे काम भारतातही अनेक वर्षे केलं गेलं आहे.

आज आंतरराष्ट्रीय अॅनिमेशन दिन आहे

भगिनी निवेदिता म्हणजे पूर्वाश्रमीच्या मार्गारेट एलिझाबेथ नोबल- लेखिका, शिक्षिका, सामाजिक कार्यकर्त्या व स्वामी विवेकानंद यांच्या शिष्या होत्या.नोबल कुटुंब हे धर्मजिज्ञासा, सुशीलता आणि सात्त्विकता यांच्याविषयी प्रसिद्ध होते.

स्वामी विवेकानंद यांनी शिकागो येथील सर्वधर्म परिषदेत भारतीय तत्त्वविचार मांडून स्वतःची छाप उमटविली आणि त्यांचे सर्वदूर कौतुक झाले. त्यानंतर काही काळाने स्वामीजी लंडन येथे आले. त्यांची व्याख्याने ऐकायला मार्गारेट जाऊ लागली. तिला स्वामी विवेकानंद यांच्या तत्त्वविचारांचे आकर्षण वाटू लागले. एक आदर्श दार्शनिक म्हणून स्वामीजींकडे ती आदराने पाहू लागली. आणि त्यामुळेच ती त्यांना अल्पावधीतच सद्गुरू असे संबोधू लागली. मानवामध्ये चारित्र्य घडण करणारे शिक्षण स्वामीजीना अपेक्षित होते, त्यासाठी महान निश्चयाने कार्य करू शकणाऱ्या व्यक्ती त्याना हव्या होत्या. त्यांच्या या आवाहनाला मार्गारेटने प्रतिसाद दिला आणि स्वामीजींच्या कार्यात सहभागी होण्याची मनापासून तयारी दाखविली.

२८ जानेवारी १८९८ रोजी मार्गारेट भारतात आल्या . दरम्यानच्या काळात कलकत्यात राहून तिने हिंदू चालीरीती, परंपरा समजावून घेतल्या. रामकृष्णांच्या पत्नी माता शारदादेवी यांचे आशीर्वाद तिला आणि स्वामींच्या अन्य परदेशी महिला शिष्याना लाभले. २९ मार्च १८९८ ला मार्गारेटला दीक्षा लाभली .स्वामीजींनी तिचे नाव भगिनी निवेदिता असे ठेवले निवेदिता म्हणजे ईश्वरीय कार्याला समर्पित केलेली ! स्वामाजीनी तिला सांगितले होते ही हिंदुस्थानासाठी कोणाही युरोपियन व्यक्तीला काम करायचे असेल तर त्याने पूर्ण हिंदू झाले पाहिजे. त्याने हिंदू चालीरीती, पद्धती ग्रहण केल्या पाहिजेत. ही साधना अवघड होती पण निवेदितानी आपलेपणाने ह्या सर्व गोष्टी शिकून घेतल्या आणि हिंदुस्थान हे तिचे आजीवन कार्यक्षेत्र बनले.

इ.स. १८९८मध्ये मध्य कलकत्त्यात आलेल्या प्लेगच्या साथीच्या निवारणाच्या कामी स्वामीजींनी निवेदितांच्या मदतीने केले. या कार्यामुळे तेथील लोकांच्या मनात भगिनी निवेदितांबद्दल मोठा विश्वास उत्पन्न झाला. स्वामी विवेकानंदांच्या सहवासात निवेदितांचे शिक्षण सुरू होतेच. स्वामी विवेकानंद यांचे निधन ही निवेदिताच्या आयुष्यातील महत्त्वाचीच घटना होती.स्वामीजींची राष्ट्रजागृतीची विचारधारा जागृत ठेवण्याचे महत्त्वाचे काम आता निवेदितांनी हाती घेतले.

‘मी त्यांची मानसकन्या जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत विवेकानंदांची, त्यांच्या अंतरंगाची विस्मृती लोकांना होऊ देणार नाही’ असा पण करून निवेदितांनी कार्यारंभ केला. हिंदुस्थानचे पुनरुज्जीवन, हिंदुस्थानचे स्वातंत्र्य याची आस बंगाली युवकांच्या मनात निर्माण करण्याचे कार्य निवेदिताने हाती घेतले.

निवेदितांचे कार्य युवकांना आणि युवतींना सतत प्रेरणादायी असेच आहे. भगिनी निवेदिता यांचे विचार- कला, विज्ञान, शिक्षण उद्योग, आणि व्यापार या सर्व गोष्टी यापुढे दुसऱ्या कोणत्या हेतूसाठी नव्हेत तर भारताच्या, मातृभूमीच्या पुनर उभारणीच्या हेतूसाठीच करायला हव्यात . मातृभूमीच्या पुनर् घडणीसाठी कलेचे पुनरुज्जीवन व्हायला हवे .

१८६७: स्वामी विवेकानंदांच्या शिष्या मार्गारेट नोबल ऊर्फ भगिनी निवेदिता यांचा जन्म. (मृत्यू: १३ ऑक्टोबर, १९११)

  • घटना :
    १४२०: बीजिंगला अधिकृतपणे मिंग साम्राज्याची राजधानी म्हणून नियुक्त केले गेले.
    १४९०: क्रिस्टोफर कोलंबस पहिल्या प्रवासानंतर क्युबा मध्ये पोहोचले.
    १६३६: अमेरिकेतील हारवर्ड विद्यापीठाची (Harvard University) स्थापना.
    १८८६: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ग्रोव्हर क्लीव्हलँड यांनी स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा राष्ट्राला अर्पण केला.
    १९०४: पनामा आणि उरुग्वे यांच्यात राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.
    १९२२: बेनिटो मुसोलिनीच्या नेतृत्त्वाखाली ईटलीतील फॅसिस्टांनी रोममधील सरकार उलथवले.
    १९४०: दुसरे महायुद्ध – ईटलीने ग्रीसवर हल्ला केला.
    १९६९: तारापूर अणूवीज निर्मिती केंद्र सुरू झाले.
  • मृत्यू :
    • १८११: राजराजेश्वर सवाई श्रीमंत यशवंतराव होळकर बहादूर यांचे निधन. (जन्म: ३ डिसेंबर, १७७६)
    • २०१३: भारतीय लेखक राजेंद्र यादव यांचे निधन. (जन्म: २८ ऑगस्ट, १९२९)
  • जन्म :
    १८६६ : श्री अक्कलकोटस्त परब्रह्म श्री स्वामी समर्थांच्या प्रभावळीतील अद्वितीय असे रत्न श्रीबाळकृष्ण महाराज सुरतकर. श्रीबाळकृष्ण महाराज हे आपल्या सर्वांना अतिप्रिय व सर्वश्रुत असलेल्या दादर येथील स्वामी मठाचे संस्थापक यांचा जन्म दिन ( देहत्याग : ५ जून १९१८ रोजी सूर्योदयी – वैशाख कृ.एकादशी )
    १८९३: शंकर केशव कानेटकर ऊर्फ कवी गिरीश यांचा जन्म. (मृत्यू: ४ डिसेंबर, १९७३)
    १९३०: हिन्दी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गीतकार लालजी पाण्डेय तथा अंजान यांचा जन्म. (मृत्यू: १३ सप्टेंबर, १९९७)
    १९५५: भारतीय वंशाच्या अमेरिकन कॉर्पोरेट अधिकारी इन्द्रा नूयी यांचा जन्म.
    १९५८: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा जन्म.
आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Select Language »