‘शून्य टक्के मिल बंद’ ची अंमलबजावणी शक्य : आहेर
पुणे : श्री व्यंकटेश कृपा साखर कारखाना प्रा.लि. (जातेगाव, जि. पुणे) येथे ‘डीएसटीए’चे संचालक आणि प्रतिथयश सल्लागार श्री. वा. र. आहेर यांचे २१ एप्रिल रोजी व्याख्यान झाले. कारखाना सुरू असताना मिल बंद पडल्यास प्रचंड नुकसान होते, त्यासाठी ‘शून्य टक्के मिल बंद तास’ या संकल्पनेची अंमलबजावणी करावी, असे आवाहन त्यांनी केले.
‘शून्य टक्के मिल बंद तास’ ही संकल्पना आहेर यांनी विविध उदाहरणांसह समजावून सांगितली.
साखर कारखान्याचे सरव्यवस्थापक श्री. सातकर यांच्या पुढाकाराने श्री. सोनवणे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात, अधिकारी आणि कारखाना कर्मचारी यांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि टेक्निकल स्कील डेव्हलपमेंट कार्यक्रमांतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
श्री.सातकर यांनी प्रास्ताविक करून श्री. आहेर यांचा परिचय करून दिला. त्यानंतर चिफ इंजिनिअर श्री.निघुते यांनी ‘शून्य टक्के मिल बंद तास’ या संकल्पनेचे महत्त्व विशद केले. श्री. आहेर यांचे कारखान्याशी निकटचे संबंध असल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले.
कारखाना सुरू असताना मिल बंद झाल्यावर कारखान्याचे लाखो रुपयांचे नुकसान होते हे श्री. आहेर यांनी आकडवारीसह समजावून सांगितले. यावर उपाययोजना म्हणून “शुन्य टक्के मि बंद तास’ या संकल्पनेची अंमलबजावणी याविषयी शास्त्रीय पद्धतीने माहिती दिली.
आपण सुयोग्य नियोजन करून अनलोडर ते शुगर ग्रेडर पर्यंतचे ऑफ सीझनमध्येच कसोशीने मेंटेनन्स करून वेळेचे, कामगारांचे, स्पेशल पार्टचे आणि व्यवस्थापनातर्फे आर्थिक नियोजन करून आपण साखर “शुन्य टक्के मिल बंद’ ही संकल्पना यशस्वी करावी आणि ते शक्य आहे, असे आहेर म्हणाले.
English version also to be published so that more people know the subject as the facts are to known to all .
Sure hon. Ayyangar ji.
This web is three languages. Hindi, Marathi n English. Reader can change language preference.
Pl see bottom right icon for translation
Pl let’s know your feedback.
Thanks for good suggestion