म. फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पाटील यांचे निधन

आवडल्यास ही बातमी शेअर करा

अहिल्यानगर : महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील यांचे अल्पशा आजाराने बुधवारी ( दि.२९) रोजी पुण्यात पहाटे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. कृषी क्षेत्रातील संशोधन व विस्तार उपक्रमातील सेवेचा त्यांना ३३ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव होता.

पुण्यातील कृषी महाविद्यालयात सकाळी कुलगुरू पाटील यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी चाहते आणि कृषी क्षेत्रातील व्यक्तींची गर्दी झाली होती. त्यांचे मूळ गाव सांगली जिल्ह्यातील कवठे एकंद आहे. तेथे दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा कुलगुरु पदाचा पदभार सांभळण्यापूर्वी त्यांनी मुंबई येथील केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेच्या (सिर्कोट) संचालक पदाची व तंत्रज्ञान हस्तांकरण प्रमुख ही महत्वाची पदे भूषवली आहेत. काही काळ त्यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिक येथील प्रभारी कुलगुरू या पदाचा देखील कारभार सांभाळला होता.

कृषी क्षेत्रातील संशोधन व विस्तार उपक्रमातील सेवेचा त्यांना ३३ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव होता. ४ पुस्तके, १९९ संशोधनात्मक पेपर, तांत्रिक शिक्षणासंबंधीची १४ पुस्तके व १ पेटंन्ट त्यांच्या नावावर जमा आहे. राहुरी कृषी विद्यापीठांमध्ये कुलगुरु पदाची धुरा सांभाळल्यानंतर त्यांनी सुयोग्य निर्णय घेऊन विद्यापीठाला शिक्षण, संशोधन व विस्तारत विद्यापीठाला नावलौकिक मिळवून दिले. त्यांच्या कुशल नेतृत्वामुळे विद्यापीठाला नुकतेच उत्कृष्ट ‘ए’ ग्रेड मानांकन प्राप्त झाले आहे.

कर्मचारी, अधिकारी व शेतकऱ्यांच्या हिताचे बरेच निर्णय त्यांनी घेतले. यामध्ये विद्यापीठातील कर्मचाऱ्यांकरिता कारकीर्द प्रगती योजना, १२/२४ आश्वासित प्रगती योजना, कर्मचाऱ्यांच्या सोयीस्कर पदस्थापना, अनुकंप भरती, सेवानिवृत्त लाभ व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सुधारित निवृत्तीवेतन, विद्यापीठ प्रकल्पग्रस्तांची जाहिरात. तसेच, त्यांच्या नेतृत्वाखाली विद्यापीठामध्ये नाविन्यपूर्ण संशोधन प्रकल्प सुरू करण्यात आले.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »