विखे कारखान्याचा गळीत हंगाम सुरू

नगर : प्रवरानगर येथे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखानाचा ७४ वा ऊस गळीत हंगाम शुभारंभ माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील ,जि.प. माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील व खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

याप्रसंगी प्रवरा सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ भास्करराव खर्डे पाटील,ट्रक वाहतूक सोसायटीचे अध्यक्ष नंदकिशोर राठी, कारखान्याचे अध्यक्ष कैलास तांबे, प्रवरा भाजीपाला सोसायटीच्या अध्यक्षा सौ. गीता थेटे, भाजपचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे, भाजपचे तालुका अध्यक्ष व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर, शांतीनाथ आहेर, मच्छिंद्र थेटे, अण्णासाहेब कडू, कारखान्याचे उपाध्यक्ष सतीश ससाणे, कार्यकारी अधिकारी अमोल पाटील यांच्यासह सर्व संचालक, अधिकारी व कामगार, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.