आंतरराष्ट्रीय साखर उद्योग प्रदर्शनाची ही पाहा झलक
पुणे : ऊस विकास आणि संशोधन क्षेत्रातील अग्रगण्य संस्था वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट अर्थात व्हीएसआयची आंतरराष्ट्रीय साखर परिषद १२ ते १४ जून २०२४ दरम्यान आयोजित करण्यात आली होती.
आदल्या दिवशी, म्हणजे ११ तारखेला व्हीएसआयची सर्वसाधारण सभा आणि पुरस्कार वितरण कार्यक्रम होता. शुगरटुडे मासिकाच्या टीमने चारही दिवस व्हीएसआयच्या पुण्यानजीकच्या मांजरी येथील संकुलात मुक्काम चार दिवस ठोकला आणि संपूर्ण वृत्तांकन केले. साखर उद्योगाशी संबंधित सर्वांसाठी ही खास पर्वणीच म्हणावी लागेल. मात्र ज्यांना हे प्रदर्शन पाहता आले नाही, त्यांच्यासाठी ‘शुगरटुडे’ने ते उपलब्ध केले आहे.
या आंतरराष्ट्रीय साखर परिषदेचा विषय होता : ‘साखर उदयोगाच्या शाश्वतेपुढील आव्हाने आणि संधी’. जगभरातील सुमारे दोन हजार प्रतिनिधींनी परिषदेला हजेरी लावली, आंतरराष्ट्रीय साखर तज्ज्ञांनी तीन दिवस विविध विषयांवर मार्गदर्शन केले. या निमित्ताने भरवण्यात आलेल्या प्रदर्शनात सुमारे पाचशे कंपन्यांनी आणि साखर कारखान्यांनी सहभाग घेतला.
यानिमित्ताने आंतरराष्ट्रीय स्तरावरील आयोजन कसे असावे, याचा आदर्शच व्हीएसआयने निर्माण केला आहे. त्याबद्दल या संस्थेचे महासंचालक संभाजी कडू पाटील आणि सल्लागार शिवाजीराव देशमुख यांचे ‘शुगरटुडे’च्या वतीने खूप खूप अभिनंदन.
प्रदर्शनाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री आणि नवीनीकरणीय ऊर्जा विषयाचे अभ्यासक नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. ‘शुगरटुडे’ने तीनही दिवस या प्रदर्शनाचा फेरफटका मारला आणि सर्वांशी बातचित केली. साखर उद्योग क्षेत्रातील सर्वच घटक एका छताखाली आणण्याचा व्हीएसआयचा प्रयत्न, देशभरातील उद्योगांनी आणि साखर कारखान्यांनी दिलेल्या प्रचंड प्रतिसादामुळे कमालीचा यशस्वी झाला.
लाखो लोकांनी प्रदर्शनाला भेट दिली. त्यासाठी व्हीएसआयने अत्यंत चोख व्यवस्था ठेवली होती. पुढील प्रदर्शन २०२६-२७ साली होईल आणि पुन्हा एकदा अवघे साखर विश्व आपणाला एकाच मांडवाखाली पाहण्याची संधी मिळेल. चला तर मग, यंदाच्या प्रदर्शनाची एक झलक पाहू आणि काही मान्यवरांशी बातचित करू या