‘शून्य टक्के मिल बंद तास’वर तज्ज्ञ आहेर यांचे मार्गदर्शन
बीड : “एकच ध्यास, शून्य टक्के मिल बंद तास”, तसेच “हायप्रेशर बॉयलरचे ऑपरेशन, मेंटेनन्स आणि सुरक्षितता या विषयांवर साखर उद्योगातील प्रथितयश सल्लागार आणि डीएसटीएचे संचालक वा. र. आहेर यांचे लोकनेते सुंदररराव सोळंके सहकारी साखर कारखाना लि. सुंदरनगर, जिल्हा-बीड येथे नुकतेच व्याख्यान झाले.
साखर कारखान्याचे मार्गदर्शक प्रकाशदादा सोळंके यांच्या सक्रिय मार्गदर्शनाखाली, आणि कार्यकारी संचालक महादेव घोरपडे यांच्या पुढाकाराने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात, कारखान्याचे जनरल मॅनेजर (डिस्टीलरी) डी. एम. वरे, वर्क्स मॅनेजर एस. के. तौर, डेप्यु. चिफ इंजिनिअर सगरे, चिफ केमिस्ट भुजंग शेवाळे, सर्व इंजिनिअर, केमिस्ट आणि कारखाना कर्मचारी यांना श्री. आहेर यांनी मार्गदर्शन केले.
टेक्निकल स्कील डेव्हलपमेंट कार्यक्रमांतर्गत श्री. आहेर यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले होते. वर्क्स मॅनेजर श्री. तौर यांनी प्रास्ताविक करून श्री.आहेर यांचा परिचय करून दिला आणि नंतर श्री. आहेर यांचा साखर कारखान्याचे मार्गदर्शक मा.आ. प्रकाश सोळुंके यांनी सत्कार केला.
।।”एकच ध्यास,एकच ध्यास” ।। ।।”शुन्य टक्के मील बंद तास”।। या संकल्पनेचे महत्त्व आहेर यांनी विशद केले . कारखाना सुरू असताना मिल बंद झाल्यावर कारखान्याचे लाखो रुपयांचे नुकसान कसे होते हे त्यांनी आकडवारीनिशी सांगून, त्यावर उपाययोजना म्हणून “शून्य टक्के मिल बंद तास’ या संकल्पनेची अंमलबजावणी कशी करायची याविषयी शास्त्रीय पद्धतीने माहिती दिली.
दुसर्या सत्रात हाय प्रेशर बॉयलरची चालू असताना घ्यावयाची काळजी आणि ऑफ सिझन मध्ये करावयाचे मेंटेनन्स तसेच बॉयलरची सुरक्षितता आणि शासकीय नियमांचे पालन या विषयावर शास्त्रीय पद्धतीने विवेचन करून आहेर यांनी महत्त्वाच्या टिप्स दिल्या.
श्री. आहेर यांनी उपस्थितांच्या शंकांचे समाधानकारण निरसन केले. त्यामुळे त्यांच्यामध्ये बॉयलर आणि मिलच्या कामकाजाविषयी आत्मविश्वासाचे वातावरण निर्माण झाले.
दुस-या सत्रात चेअरमन श्री. वीरेंद्र सोळंके, व्हा. चेअरमन श्री. जयसिंगराव सोळुंके यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. श्री.वरे यांनी आभार मानले.