व्यवस्थापनातील शोधनिबंधासाठी वा. र. आहेर यांचा गौरव

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे : डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट्‌स असोसिएशन (इंडिया) पुणे या संस्थेच्या 68व्या वार्षिक अधिवेशनात मॅनेजमेंट विषयावर शोधनिबंध सादर केल्याबद्दल तंत्र सल्लागार वा. र. आहेर यांचा, महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पदक आणि प्रशस्तीपत्र देऊन नुकताच सत्कार करण्यात आला.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष एस. बी. भड, उपाध्यक्ष एस. एस. शिरगावकर, एस. डी. बोखारे, राष्ट्रीय सह. साखर संघाचे जयंत नाईकनवरे,राज्य सह.साखर संघाचे एमडी. संजय खताळ, एन एस आय कानपूरचे संचालक नरेंद्र मोहन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

दोन दिवसीय अधिवेशनात साखर उद्योगातील आठशे प्रतिनिधी हजर होते. दुसऱ्या दिवशी टेक्निकल सेशन श्री. आहेर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. साधारण पंचवीस टेक्निकल विषयावरील शोधनिबंध सादर झाले. आहेर यांनीही आपला शोधनिबंध सादर केल्याबद्दल त्यांचा श्री.भड यांच्या हस्ते समारोप समारंभात गौरव करण्यात आला.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »