NSL शुगर येथे शून्य टक्के मिल ब्रेकडाऊनवर चर्चासत्र
मंड्या : साखर उद्योग क्षेत्रात ‘शून्य टक्के मिल बंद तास’ (झिरो पर्सेंट मिल ब्रेकडाऊन) ही संकल्पना राबवून, सातत्याने त्याचा प्रसार करून अनेक साखर कारखान्यांचा फायदा करून देणारे नामवंत तज्ज्ञ वा. र. आहेर यांनी एनएसल शुगर (मंड्या – कर्नाटक) येथेही वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.
पाच साखर कारखान्यांच्या NSL शुगर ग्रुपने 19 आणि 20 जुलै 2024 रोजी मेसर्स एनएसएल शुगर लि. कोप्पा जि.मंड्या, कर्नाटक येथे वरील महत्त्वाच्या विषयांसह दोन दिवसीय चर्चासत्राचे आयोजन केले होते.
साखर उद्योगातील शून्य टक्के मिल ब्रेकडाउन या विषयावर व्याख्यान देणासाठी महाराष्ट्रातील प्रथितयश तांत्रिक सल्लागार श्री. आहेर होते. त्यांनी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून प्रतिबंधात्मक देखभाल पद्धतींनी ब्रेकडाउनच्या अडचणींवर मात कशी करावी, तसेच शून्य टक्के मिल ब्रेकडाउन संकल्पना रूजविण्यासाठी काय दक्षता आणि उपाययोजना आवश्यक आहेत, या विषयावर चर्चा केली.
श्री. आहेर यांनी परिसंवादात प्रगत उभारणी पद्धती आणि मिल ऑपरेशन्सवर सखोलपणे भाष्य केले. वरिष्ठ उपाध्यक्ष श्री. अरुलप्पन, उपाध्यक्ष तांत्रिक श्री. राजशेखर, मेसर्स एनएसएल शुगर लि.कोप्पा युनिटचे युनिट प्रमुख श्री. रामचंद्रराव, डीजीएम कोप्पा युनिट श्री शिवरामू आणि एनएसएल ग्रुप बेंगलोरचे शांतीभूषण दास व्यवस्थापक एचआर यावेळी उपस्थित होते.
व्याख्यानासाठी एनएसएल ग्रुपच्या पाच साखर युनिटचे चिफ इंजिनिअर,, चिफ केमिस्ट आणि केमिस्ट आणि अभियंते उपस्थित होते. सेमिनारमध्ये ब्रिक्स कर्वच्या महत्त्वावर सखोल चर्चा झाली. श्री. आहेर यांनी परिसंवादात सर्व उपस्थितांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे देऊन एनएसएल साखर उद्योगात शून्य टक्के मिल ब्रेकडाउन संकल्पना रूजविली. श्री.शांतीभूषणदास यांनी आभार प्रदर्शन केले.