आयुष्याची गाडी
हळुहळू चालवा ही आयुष्याची गाडी।
अजून बरीच सोडवायची हो कोडी॥
काही दुखणी व्हायची बरी।
काही कामे करायची पुरी॥
काहींना सोसवेना धडाका।
उडाला हो रागाचा भडका॥
आहेरे नाहीरे समीप आणायचे आहेत।
काही इच्छा अजूनही अपूर्ण आहेत॥
दबलेल्या इच्छा दफनायच्या आहेत।
अनेक कर्जे अजून भरायची आहेत॥
काही दूर गेली काही मागे पडली।
काही नाती बनली आणि तुटली॥
त्या तुटलेल्या नात्यांमधल्या,।
जखमा भरायच्या राहिल्या॥
काही सहभागींना मी डावलले ।
तर काहींचे मन मी दुखावले ॥
आसू पुसायला कोणीच नाही।
आता जनता दुधखुळी नाही॥
यासाठीच मला काम करायचे।
आता तु माझ्या साथीला यायचे ॥
या श्वासावर तुझाच अधिकार।
आता तरी समजून घ्या सरकार ॥
हा जीव या ऋणातून मुक्त करावा ।
म्हणून आयुष्याची गाडी हळू चालवा॥
रचनाकार:
आहेर वा.र.नासिक
बी.ई.एमआयई.बीओई
९९५८७८२९८२