लक्षणे माणूस मित्राची

लावायचा असेल तर बाग लावा|
मात्र आगीत कधी तेल टाकू नका||
लावायचे असेल तर दीप लावा|
मात्र दुसऱ्याचा उत्कर्ष जाळू नका ||१||
करायचे असेल तर काम करा |
मात्र प्रसिद्धीसाठी काम करू नका||
करणार असाल तर दान करा|
मात्र तेव्हा कोणाचा जीव घेऊ नका ||२||
शिकाल तर असं काही मस्त शिका|
लाखमोलाचा हिरा व्हायला शिका||
अशा माणसाला मरण येईल का|
जो देह झिजवी चंदनासम फुका ||३||
त्यांच्यावरही मात्र प्रेम करायला शिका|
जो दुसऱ्यांचे अश्रू पुसतो सौ टका||
त्यांच्या विचारांना विरोध करा पक्का|
मात्र माणसाला विरोध करू नका ||४||
माणसांशी मतभेद जरूर ठेवा|
मात्र मनात मनभेद ठेवू नका||
नशिबाने वेळेवर नक्की मिळेल |
त्यासाठी उतावीळपणा करु नका||५||
आहेर वाळू रघुनाथ (नाशिक)