रडू नको मुला !

आवडल्यास ही बातमी शेअर करा

चिमणी येईल |
चिवचिव करील||
दाणा पाणी घेईल |
खेळविल तुला ||१||


वारा येईल |
गाणे गाईल||
नाचून घेईल |
खेळविल तुला ||२||


झाड बोले|
सावली देईल ||
ताप हरील|
खेळविल तुला ||३||


फुल बोलले |
गंध देईल तुला ||
रंग देईल तुला |
खेळविल तुला ||४||


मग बोले सृष्टी |
काढी त्याची दृष्टी ||
नको होऊ कष्टी |
खेळविल तुला ||५||


ढग दाटतील |
पाऊस पडेल ||
नद्या वाहतील|
खेळविल तुला ||६||


आकाश डोले|
चंद्र तारे आले||
जग चंदेरी बोले |
खेळविल तुला ||७||


मी आहे तुजला |
घास भरायला ||
रडू नको मुला |
खेळविल तुला ||८||

आहेर वाळू रघुनाथ (नाशिक)

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »