मेहनतीचे फळ

आवडल्यास ही बातमी शेअर करा

जोश टिकण्यासाठी ठेवा ध्यानी हेही|
मेहनती शिवाय यश कोठेही नाही||

ध्येयाची वाटचाल करा काळोखातही|
बघा काजवे चमकती अंधारातही||१||


मेहनतीने दीपक प्रज्वलित करा|
विजयश्रीची पताका फडकत ठेवा||
जीवनात सुखदुःख पाळीने येतील|
त्याचसोबत आपणही पुढेच जावा||२||


अनुभव  मेहनतीचे सोनं करील|
ध्येयासाठी मेहनत करावी लागेल||
मेहनती शिवाय काही मिळत नाही|
उन्हात उभे राहून सावली दिसेल||३||


नको बोलणे, दे रे हरी पलंगावरी|
असा काहीआपुला हरी देणार नाही||
करणे नाही आराम, तो हराम आहे|
कष्टा केल्याशिवाय फळमिळत नाही||४||


आज केले जरासे कठीण परिश्रम|
उद्या ते आनंद घेऊन घरी येतील||
मेहनतीचे मोल हे आहे अनमोल|
कष्ट केल्यास जरूर लाभ मिळतील||५||


संघर्षात तुम्हीच लढायचे असते|
तुमच्याकडे बघून हे जग हसते||
आपल्या यशाने जगही सोबत येते|
इतिहास सुध्दा मग त्याची नोंद घेते||६||

आहेर वाळू रघुनाथ (नाशिक)

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »