ह्याले ढोंग म्हणते!

आवडल्यास ही बातमी शेअर करा

रडू नको दादा, मी दिल्लीमधी जाते|
रेवड्या मी आणते, मग तुला भरविते||


रडू नको दादा, मी मुंबईला जाते|
मलीदा मीआणते,मग तुला भरविते||


रडू नको दादा, मी नाशिकला जाते|
शेततळे आणते,मग तुला भरविते||


रडू नको दादा, मी मंत्र्याला भेटते|
फुकट धान्य आणते, मग तुला भरविते||


रडू नको दादा मी नाथाला भेटते|
लाडकी बहिणआणते, तुला भरविते||


रडू नको दादा,  वाढप्याला भेटते|
ताटी जास्त आणते,मग तुला भरविते||


रडू नको दादा, ह्याले ढोंग म्हणते|
आता कष्ट करते,मग तुला भरविते||

इंजिनीयर: वाळू रघुनाथ आहेर (नाशिक).

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »