|| यंत्र अभियंता ||

आवडल्यास ही बातमी शेअर करा

यंत्र अभियंता ही आमची ओळख |
हातोड्यानेच करितो आम्ही पारख||
स्लाईड रूल, ड्राफ्टर आमची शान|
वर्कशॉपला देतो वेगळाच मान||१||

ड्राॅईंगवर करून जीवापाड प्रेम|
चाले डिझाइनवर सगळा गेम||
अभियंता देईन यंत्र उभारून |
क्वालिटी हेच ग्राहकाचे समाधान||२||

डोकं वापरून लावतो हे लाॅजिक|
ऑटोमेशन हेच आमचं मॅजिक||
घेतो पाच रुपये हातोडा मारून |
हजाराने घेतो योग्य जागी ठोकून||३||

अभियंता चालवी मशीन भन्नाट|
मशीन करी उत्पादन अफाट ||
तंत्रज्ञान हाच आमचा अभिमान |
करतो यंत्र अभियंत्याचा सन्मान ||४||

इंजिनिअर कवी -वाळू आहेर नाशिक

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »