I माझे जीवन कार्य I
जन क्षणभर म्हणाले कार्य काय|
तुमचे कार्य काय, कार्य काय ||
तरी सुचेना मला मी केले काय|
मग मनाचा मागोवा घेतलाय||१||
मी लोहाळा पुरात वाचलेला |
सुरुवात केली पुन्हा जगण्याला ||
धरतीवर तृणांकूर फुलविला|
असेच वारे वाहत पुढती जाय||२||
मशागतीने शेतं पिकले|
आनंदाने नदी-नाले वाहिले ||
ना काळजी चिंता क्षणभर |
जणू जळात बसला औदुंबर टाकूनि पाय|| ३||
ना सगेसोयरे मदतीला आले|
उठले बसले खिदळले।|
पुन्हा आपल्या कामी लागले।
माझे त्यात काय नुकसान नाय ।।४||
थोर पुरुष दुनियेत होऊन गेलेय |
जग रहाटीला वळण लावलेय ||
श्रमिकांची मिळकत वाढलीय
त्यात माझा खारीचा वाटा हाय||५||
या जगाला आनंदाने भरावे|
मोहात कुणाच्या न गुंतावे ||
मनाने सत्शील माणूस व्हावे |
शांततेत जगावे, आस-याला माय||६||
रचनाकार: आहेर वाळू रघुनाथ, नाशिक
मोबाईल फोन ९९५८७८२९८२