दैव देते आणि कर्म नेते

आवडल्यास ही बातमी शेअर करा

वडलांची लेक होते, बहीण होते|
काळानुरूप माझं नाते बदलले||
दादल्याची बाईल झाले,सून झाले|
माहेरी भाच्यासाठी आत्याबाई झाले||१||


पुढं सून आली हो सासूबाई झाले|
काळ नडला नशीब पालथं झाले||
७८चा  खूप मोठं खरपडं पडले|
आख्खं घरदार देशोधडी लागले||२||


पुढंच्या काळात करोनाने गाठले|
जवळ होतं ते पार  सगळं गेले||
पाठचे,पोटचे, चुलत सर्व गेले|
काळाने मलाही वा-यावर सोडले||३||


आता वय झाले, म्हातारपण आले|
संजय  निराधार योजना मिळते||
कामधंदा गेला,खायचे हाल झाले|
लाडकी बहिण योजनात बसते ||४||


जोडीला शिवभोजन थाळी मिळते|
रोज मठात झाडांना पाणी घालते||
रामकृष्ण हरी नित्य वाट पाहते|
धाडं सांगावा त्याला रोजचं म्हणते||५||

रचनाकार : आहेर वाळू रघुनाथ, नाशिक

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »