घायाळ मी हरिणी…

कुठल्या देशी तु कसा गेला|
गेला दुरदेशी तुम्ही तिथे
ना निरोप ना पत्र मजला ||
ठेस लागली मनाला इथे ||१||
जाताना दिली असेल हाळी|
टाकला तुम्ही’तिथे उसासा ||
तेव्हा कुठे होती तुझी बाळी|
मला न तो कळला जरासा||२||
जिथे तिथे तुझाच गजर|
घराचा ना घेतला निरोप||
माझ्या अश्रूंचा इथे कहर|
माझा नाही कसला आरोप||३||
बसले मनात मांडे खात|
येता सय उमाळे साथीला||
गेला कुठे तु सोडून हात|
अश्रू करिती हैराण मला||४||
सय येता जीव वेडावतो|
जीव घायाळ या हरिणीचा||
कसा शेव ओलाचिंब होतो|
ठाव कसा घेऊ मी मनाचा||५||
मन शोधून राहिले तुला|
मी कसं समजावू तयाला||
कुठल्या देशी तु कसा गेला|
परतुनी ये भेटण्या मला||६||
- वाळू रघुनाथ आहेर, नाशिक