इकडे तिकडे चोहीकडे

गरिबीचे वाकडे, इकडेतिकडे चोहीकडे|
वरती खाली द्वेष भरे, वायूसंगे सुड जुडे||
त्वेषाने फिरला, जगी भरला, दिशात उरला|
दारिद्रय वाडीकडे, इकडे तिकडे चोहीकडे||१||
दुपारचे उन्हामध्ये भानामती हसते आहे|
उठले संध्या पानासाठी गाणे गाती पलिकडे||
पार्टीत रंगले,अफुच्या गोळीने चित्त दंगले|
दुष्टांचा बाजार हा,इकडे तिकडे चोहीकडे||२||
सपाट केले निर्झराला, डोलते वृक्ष तोडती|
चिमण्या हाकलल्या,मग कोणाला गाती बापडे||
पद्म फुलले, भ्रमर पळाले, रडत वदले|जे
महिला अत्याचार,इकडे तिकडे चोहीकडे||३||
समाजाचे रक्षणासाठी,देश वाचवण्यासाठी|
स़ंत सज्जन जागे झाले,पाहती समाजाकडे||
जगजेठी नाठाळाचे माथी मारतील हो काठी|
आशेचा किरण हा,इकडे तिकडे चोहीकडे||४||
विडंबन: (आनंदी आनंद गडे)
– रघुनंदन, नाशिक