नर्मदा शुगर येथे आहेर यांचे व्याख्यान

आवडल्यास ही बातमी शेअर करा

नर्मदा : गुजरातमधील नर्मदा शुगर येथे मिल-बॉयलर मेंटेनन्स आणि ऑपरेशन याविषयावर महाराष्ट्रातील निष्णात तंत्रज्ञ वा. र. आहेर यांचा एक दिवसीय सेमिनार नुकताच झाला.

सेमिनारच्या अध्यक्षस्थानी नर्मदा सहकारी खांडउद्योग मंडळी लि.चे चेअरमन घनश्यामभाई पटेल होते. वा.र आहेर यांनी यावेळी मिल आणि हायप्रेशर बॉयलर मेंटेनन्स आणि ऑपरेशन याविषयावर मशिनरींची देखभाल, दुरुस्ती संदर्भातील नवीन टेक्निक सोप्या भाषेत समजावून सांगितले. तसेच उपस्थितांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली.

सेमिनारसाठी कारखान्याचे एमडी नरेंद्रभाई पटेल, वर्क्स मॅनेजर शाक्य, चिफ इंजिनिअर सुनिलभाई पटेल आणि प्रॉडक्शन मॅनेजर श्री. रॉय, इंजिनिअर, केमिस्ट आणि कामगार बांधव आवर्जून उपस्थित होते.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »