साखर उद्योगातील कामगारांना नवीन तंत्रज्ञानाच्या प्रशिक्षणाची गरज

आवडल्यास ही बातमी शेअर करा

 नामवंत साखर तंत्रज्ञ वाळू आहेर यांचे प्रतिपादन

अहिल्यानगर :  सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना लि.अमृतनगर, (संगमनेर) येथे नवीन तंत्रज्ञानाचे प्रशिक्षणांतर्गत नामवंत साखर  उद्योग तंत्रज्ञ वाळू रघुनाथ आहेर यांनी नुकतेच मार्गदर्शन केले.

“शुन्य टक्के मिल बंद तास” आणि “हाय प्रेशर बॉयलर नवीन तंत्रज्ञान”या दोन विषयांवर मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की,साखर उद्योगातील कामगारांना नवीन तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे कारखान्याची कार्यक्षमता आणि उत्पादकता वाढण्यास मदत होते.

कारखाना सुरळीत चालविण्यासाठी ऑफ सिझनमध्ये  मिल, बॉयलर, बायलींग हाऊससह  प्रत्येक मशिनरीवर करावयाच्या उपाययोजना आहेर यांनी, सर्व तपशीलासह समजावून सांगितल्या.

या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी कारखान्याचे उपाध्यक्ष श्री. पांडुरंग घुले पाटील होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जगन्नाथ घुगरकर,(कार्यकारी संचालक) यांनी केले आणि संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला.

कार्यक्रमास चिफ इंजिनिअर नवनाथ गडाख, चिफ केमिस्ट अनिल पाटील, सर्व इंजिनीयर, केमिस्ट,,स्कील्ड स्टाफ, सर्व सुपरवायझर आणि कामगार वर्ग उपस्थित होते.

शेवटी श्री. घुगरकर यांनी कार्यक्रमाविषयी समाधान व्यक्त करताना, आहेर यांचे आभार मानले.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »