।। लगीनघाई गळीत हंगामाची ।।

आवडल्यास ही बातमी शेअर करा

रविवारची कविता

मुहूर्तमेढ रोवली येत्या गळीत हंगामाची।
लगीनघाई सुरू झाली तयारीची।।

सुरू झाले नियोजन कारखान्याचे।
पैशाचे,मालखरेदीचे, ऊस नोंदीचे।।

मजूरभरतीचे, मशिनरी दुरूस्तीचे।
चटया बांबू कोयते खरेदीचे।।

साखर,मळी, इथेनॉल विक्रीचे।
सुरू झाल्या चकरा व्यापाऱ्यांच्या ।
मजुर भरतीसाठी वा-या शेतकीच्या।।
बीड, पाथर्डी, आष्टी, पाटोद्याच्या।
लटपटी, खटपटी बघुन मुकादमाच्या।।

त्यांनाअधिकारी देती रकमा खर्चीच्या।
मजुर भरतीचे मोठे गहन कोडे ।
अवघा महाराष्ट्र नतमस्तक तयापुढे ।।
करून सणवार पोळा अन दसरा ।
थळावर दिवाळीला शाळेचा आसरा।।

रचनाकार:
आहेर वा.र. (नासिक)
9958782982

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »