॥ सरे रात्र, फुटे तांबडे ॥

आवडल्यास ही बातमी शेअर करा

आडवाटेने तळ्याकडे जातांना
वाटेवर ती दिसली चालतांना
शीळ घातली मी ओळखीची
कळी खुलली हो प्रेमिकेची ॥१॥

तळ्यात दोघे पाय टाकून बसल्यावर
काहूर उठे लाटांचे तिच्या मनावर
ओळखीने जरा कात टाकल्यावर
दोघे मनी डोलति गोष्टी सरल्यावर ॥२॥

मन मोहरले खात चणे फुटाणे
साक्षीला होते खारे शेंगदाणे
मंतरले क्षण टिपति वाटाणे
प्रेम जागविती मक्याचे दाणे ॥३॥

रुपक होते गुलाब गज-याचे
मनात होते भाव जवळीकीचे
गजरा तिला अन सुगंध मला
आपुलकीचे बोलांनी आला ॥४॥

अजुनि डोळे हे जुल्मि गडे
कटाक्षहि ओळखति भाबडे
गुजगोष्टीत सरे रात्र फुटे तांबडे
तरीहि जमिनीवर राहणे आवडे ॥५॥

रचनाकार:

वा. र. आहेर , नासिक

बी.ई.एमआयई.बीओई
9958782982

आवाहन : साखर उद्योग क्षेत्रात काम करणाऱ्यांमध्ये लेखक आणि साहित्यिकांची कमी नाही. ‘शुगरटुडे’ अशा व्यक्तींमधील सुप्त गुणांना वाव देण्यास कटिबद्ध आहे. आपले साहित्यिक लेखन आम्हाला पाठवावे, एकच शर्त – आपण साखर उद्योग क्षेत्रात किमान पाच वर्षांपासून कार्यरत असावेत.. धन्यवाद!

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Select Language »