मार्चमध्ये साखरेचे दर कडाडणार?

आवडल्यास ही बातमी शेअर करा

केंद्राकडून २२.५० लाखटनांचा कोटा जाहीर

पुणे : केंद्र सरकारने मार्च महिन्यासाठी २२.५० लाख मेट्रिक टन साखरेचा कोटा निश्चित केला आहे. मात्र, वाढता उन्हाळा आणि सण-उत्सवांमुळे वाढणाऱ्या मागणीच्या तुलनेत हा पुरवठा कमी असल्याने मार्चमध्ये साखरेच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे.सध्या घाऊक बाजारात ‘S-30’ ग्रेड साखरेचा दर ४,००० ते ४,०५० रुपये प्रतिक्विंटल आहे. येत्या काळात त्यात किमान ५० ते १०० रुपयांची वाढ अपेक्षित आहे.

दर वाढण्याची मुख्य कारणे

अपुरा कोटा: फेब्रुवारीत २८ दिवसांसाठी जेवढा कोटा (२२.५० लाख टन) होता, तेवढाच मार्चच्या ३१ दिवसांसाठी देण्यात आला आहे. प्रत्यक्षात २३ लाख टनांची अपेक्षा होती.

सण आणि मागणी: होळी, गुढीपाडवा, रमजान आणि रामनवमी या सणांसह लग्नसराई आणि शीतपेय उद्योगाकडून साखरेला मोठी मागणी आहे.

निविदा दरात वाढ: कारखान्यांचे निविदा दर सध्या ३,७०० रुपये प्रतिक्विंटलवर असून नवीन निविदांमध्ये हे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.

साखर उत्पादनाचे गणित(२०२५-२६ हंगाम)

एकूण अपेक्षित उत्पादन: ३२४ लाख मे. टन.

इथेनॉलसाठी वापर: ३१ लाख मे. टन.

निव्वळ साखर उत्पादन: २९३ लाख मे. टन.

देशांतर्गत खप: २८३ लाख मे. टन.

हंगाम अखेर शिल्लक साठा: सुमारे ५३ लाख मे. टन राहण्याचा अंदाज आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »