‘विस्मा’च्या अध्यक्षपदी ठोंबरे यांची फेरनिवड

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे : वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (विस्मा) च्या अध्यक्षपदी बी. बी. ठोंबरे आणि उपाध्यक्षपदी आ. रोहित पवार यांची फेरनिवड झाली आहे. पुण्यातील सभेत संस्थेचे नवे कार्यकारी मंडळ निवडण्यात आले. जुन्या आणि नव्या मंडळात फारसा बदल नाही. तसेच अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि महासचिव या तिन्हींची एकमताने फेरनिवड झाली आहे. माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड आणि रवी गुप्ता यांची मानद तज्ज्ञ सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.

वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (पुणे) ही महाराष्ट्र, कर्नाटक राज्यांतील सुमारे सव्वाशेवर खासगी साखर कारखान्यांची संघटना आहे. संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा ३१ ऑगस्ट २०२४ रोजी पुणे येथे झाली. या सभेमध्ये ‘विस्मा’चे नवे कार्यकारी मंडळ सदस्य सन २०२४-२७ कालावधीसाठी बहुमताने निवडून आल्यानंतर नव्या कार्यकारी मंडळाची १४ सप्टेंबर २०२४ रोजी पुण्यातील कार्यालयात बैठक होऊन अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि महासचिव यांची निवड करण्यात आली, अशी माहिती माहिती संस्थेचे कार्यकारी संचालक अजित चौगुले एका पत्रकाद्वारे जाहीर केली.

नव्या कार्यकारी मंडळाचा कालावधी तीन वर्षाकरिता (२०२४-२०२७) आहे. महासचिवपदी पांडुरंग राऊत यांची सर्वानुमते निवड झाली. तसेच साखर उद्योगातील तज्ज्ञ मानद सदस्य म्हणून माजी साखर आयुक्त आणि ‘यशदा’चे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड व श्री रेणुका शुगर्स लि.चे कार्यकारी संचालक रवी गुप्ता यांची निवड करण्यात आल्याचे पत्रकात म्हटले आहे.


नवे कार्यकारी मंडळ पुढीलप्रमाणे :

• बी. बी. ठोबरे (अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, नॅचरल शुगर जिल्हा यवतमाळ),
• आमदार रोहित पवार (मुख्य कार्यकारी अधिकारी बारामती अॅग्रो लि. जि. पुणे),
• पाडुरंग राऊत (अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना लि. जि. पुणे),
• खासदार बजरंग सोनवणे, (अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, येडेश्वरी अॅग्रो प्रॉडक्टस् लि. जि.बीड),
• महेश देशमुख (अध्यक्ष लोकमंगल इंडस्ट्रिज ग्रुप, जि. सोलापूर),
• रणजित मुळे (कार्यकारी संचालक, गगामाई इडस्ट्रिज अॅण्ड कन्स्ट्रक्शन्स लि. जि अहमदनगर),
• यशवर्धन डहाके (अध्यक्ष पराग अॅग्रो फुड्स अॅण्ड अलाईड प्रोडक्टस् प्रा. लि. जि. पुणे),
• सौ. गौरवी भोसले (अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, जागृती शुगर अॅण्ड अलाइंड इंडस्ट्रीज लि. जि. लातूर),
• योगेश पाटील (कार्यकारी संचालक, अथणी शुगर्स लि. जि. सातारा)
• राहूल घाटगे (कार्यकारी संचालक, श्री गुरुदत्त शुगर्स लि. जि. कोल्हापूर),
• रोहित नारा (संचालक, सदगुरु श्री श्री साखर कारखाना लि. जि. सागली).

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Select Language »