‘विस्मा’चे शिष्टमंडळ भेटले गडकरींना

पुणे : वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे (विस्मा) शिष्टमंडळ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना ३ सप्टेंबर रोजी भेटले आणि साखर उद्योगाच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधले.
‘विस्मा’चे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे, रेणुका शुगर्सचे प्रेसिडेंट रवी गुप्ता आदींनी गडकरी यांची दिल्लीतील शासकीय निवासस्थानी भेट घेतली आणि मागण्यांचे निवेदन सादर केले. साखरेची एमएसपी, तसेच इथेनॉल दरांमध्ये वाढ करावी आदी मागण्यांचा त्यात समावेश आहे.
