…त्याशिवाय उसाला चांगला भावही मिळणार नाही : राजू शेट्टी

बेळगाव : साखर कारखानदारांकडून सध्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांची लूट होत आहे, त्यासाठी शेतकऱ्यांनी आता तरी संघटित होऊन त्यांच्याविरुद्ध लढा उभारावा. शेतकऱ्यांनी मरगळ झटकून साखर कारखानदारांविरोधात उभे राहण्याची वेळ आली आहे. त्याशिवाय उसाला चांगला भावही मिळणार नाही, असा सल्ला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला. ते शिरगुप्पी येथील मल्लिकार्जुन मंदिराच्या कार्यालयात आयोजित शेतकऱ्यांच्या बैठकीत बोलत होते. गे
ल्या २४ वर्षांपासून आपण शेतकरी संघटनेच्या माध्यमातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहोत, असेही शेट्टी यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी सुरेश चौगुले आणि अजित करव यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी शिरगुप्पीचे ज्येष्ठ शेतकरी तम्मा तमदडी, दादा पाटील, अण्णासाहेब कात्राळे, यांच्यासह कागवाड उगार, मंगावती, जुगूळ येथील ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.