केमिस्ट, लॅब कर्मचाऱ्यांसाठी ३१ ला कार्यशाळा
नांदेड : साखर कारखान्यांचे चिफ केमिस्ट, लॅब इनचार्ज, लॅब असि. अशा कर्मचाऱ्यांसाठी लातूर येथील विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना येथे एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. नांदेडचे प्रादेशिक सहसंचालक (साखर) एस. बी. रावल यांच्या अध्यक्षतेखाली ही कार्यशाळा होणार आहे.
साखर घट उताऱ्याबाबत माहिती भरण्यासाठी साखर आयुक्तालयाने प्रणाली विकसित केली आहे. त्याबाबत कार्यशाळेत प्रशिक्षण देण्यात येईल. नांदेड, परभणी, हिंगोली आणि लातूर जिल्ह्यांतील सर्व साखर कारखान्यांच्या संबंधित कर्मचाऱ्यांनी कार्यशाळेत सहभागी व्हावे, असे आवाहन रावल यांनी केले आहे.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे शुगर टेक्नॉलॉजी विभागप्रमुख डॉ. आर. व्ही. दाणी आणि डेवनेट सोल्युशन्सचे प्रवीण शिंदे या तज्ज्ञांना कार्यशाळेसाठी निमंत्रित केले आहे. ३१ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी ५ वाजेपर्यंत कार्यशाळा चालेल. तज्ज्ञ एस. पांडा, एन. महाना, आर. आर. पाटील हेदेखील कार्यशाळेत मार्गदर्शन करतील.