जागतिक हृदय दिन

आवडल्यास ही बातमी शेअर करा

आज सोमवार, सप्टेंबर २९, २०२५ युगाब्द : ५१२७
भारतीय राष्ट्रीय सौर अश्विन दिनांक ७ शके १९४७
सूर्योदय : ०६:२९ सूर्यास्त : १८:२९
चंद्रोदय : १२:४३ चंद्रास्त : २३:३९
शालिवाहन शक : संवत् : १९४७
संवत्सर : विश्वावसू
दक्षिणायन
ऋतु : शरद्
चंद्र माह : आश्विन
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथि : सप्तमी – १६:३१ पर्यंत
नक्षत्र : मूळ – ०६:१७, सप्टेंबर ३० पर्यंत
योग : सौभाग्य – ०१:०१, सप्टेंबर ३० पर्यंत
करण : वणिज – १६:३१ पर्यंत
द्वितीय करण : विष्टि – ०५:२३, सप्टेंबर ३० पर्यंत
सूर्य राशि : कन्या
चंद्र राशि : धनु
राहुकाल : ०७:५९ ते ०९:२९
गुलिक काल : १३:५९ ते १५:२९
यमगण्ड : १०:५९ ते १२:२९
अभिजितमुहूर्त : १२:०५ ते १२:५३
दुर्मुहूर्त : १२:५३ ते १३:४१
दुर्मुहूर्त : १५:१७ ते १६:०५
अमृत काल : २३:१५ ते ०१:०१, सप्टेंबर ३०
वर्ज्य : १२:४२ ते १४:२८
वर्ज्य : ०४:३२, सप्टेंबर ३० ते ०६:१७, सप्टेंबर ३०

नवरात्र ( आठवी माळ )
देवी महागौरी : अष्टमी किंवा नवरात्रीचा आठवा दिवस देवी महागौरीचा आहे. ती बैल किंवा पांढर्‍या हत्तीवर स्वार होऊन हातात त्रिशूल आणि डमरू घेऊन चार हात असलेली देवी आहे. तिचा आवडता रंग ‘मोरपंखी’ हिरवा आहे. महागौरीला भाविक नारळ अर्पण करतात.

कोणत्याही गोष्टीचा ताण घेणे ह्या गोष्टी ताबडतोब बंद करणे आवश्यक आहे.

हृदयरोग टाळण्यासाठी दररोज किमान अर्धा तास व्यायाम करावा. त्यामुळे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते आणि रक्ताभिसरण प्रक्रियाही सुरळीत चालते. जास्तीत जास्त पायी चालण्याचा अथवा सायकल चालविण्याचा प्रयत्न करावा. आहारात नेहमी हिरव्या पालेभाज्यांचा समावेश असावा तसेच नियमित फलहार घ्यावा. संगीत, बागकाम, वाचन आणि योगसाधनेद्वारे अथवा आपल्याला असणाऱ्या एखादया छंदात मन गुंतवून तणावापासून दूर राहावे.

आज जागतिक हृदय दिन आहे.

हमीद उमर दलवाई हे मुस्लिम समाजसुधारक व मराठी साहित्यिक होते. मुस्लिम समाजसुधारणेच्या उद्देशाने त्यांनी इ.स. १९७०मध्ये मुस्लिम सत्यशोधक मंडळ स्थापले. मुस्लिम समाजाच्या शिक्षणाचा व भाषा माध्यमाचा प्रश्न, मुसलमानांचे मराठी साहित्य, मुस्लिम समाजात आधुनिक विचार प्रणालीचा प्रयत्न अशा अनेक प्रश्नांवर हे सत्यशोधक मंडळ काम करते.

हमीद दलवाई यांनी इ.स. १९६६मध्ये सात मुसलमान महिला घेऊन मुंबईतील कौन्सिल हॉलवर मोर्चा काढाला. मुसलमानांधील तोंडी तलाक, बहुपत्नीत्व आदींमुळे त्यांच्यामधील स्त्रियांची होणारी घुसमट सरकारसमोर आणावी ही या मोर्च्याचा हेतू होता. मुसलमान स्त्रियांचा हा बहुधा पहिलाच मोर्चा असावा.

महंमद पैगंबरांचे जीवन, तसेच कुराण-हदीस यांबद्दल मोकळी, सविस्तर चर्चा मुस्लिम समाजात व्हावी, अशी त्यांची इच्छा होती. अशा चर्चेमुळे मुस्लिम समाजातील साचलेपणा दूर व्हावा, आचार-विचारात उदारता यावी, तसेच प्रबोधनाचे प्रवाह सुरू व्हावेत यासाठी हमीद दलवाईंनी आपले आयुष्य वेचले.

त्यांच्या शेवटच्या आजारातही त्यांनी स्वस्थ न बसता ‘राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान’ नावाचे पुस्तक लिहिले. हे लेखन प्रामुख्याने भारतीय मुसलमानांच्या धार्मिक प्रवृत्ती, राजकारण, त्यांचे राजकीय नेतृत्व, पाकिस्तानची चळवळ आणि उद्दिष्टे, हिंदुत्ववाद या विषयांवर आहे. त्यातील तपशील, तपशिलांमागील अर्थ, उद्याच्या भारतासाठी बदलाची गरज यांसंबंधीचे पुस्तकातील विवेचन वाचल्यावर हमीद दलवाईंच्या प्रबोधनविषयक दृष्टीची कल्पना यावी.
समाजप्रबोधनाचे काम करणार्या कोणाही दृष्ट्या नेत्याला होतो, त्यापेक्षा कितीतरी जास्त विरोध दलवाईंना झाला.

१९३२ : मुस्लिम सत्यशोधक चळवळीतील अग्रणी हमीद दलवाई यांचा जन्म ( मृत्यू : ३ मे, १९७७ )

  • घटना :
    १८२९ : लंडनच्या मेट्रोपॉलिटिन पोलिसांच्या पथकाची स्थापना झाली
    १९१६ : जॉन डी रॉकफेलर हे पहिले अब्जाधीश ठरले
    १९१७ : दादर येथे इंडियन एजुकेशन सोसायटीची पहिली शाळा किंग जॉर्ज हायस्कुल सुरु झाली
    १९४१ : दुसरे महायुद्ध – किएव्हा मध्ये नाझींनी ३३,७७१ ज्यू लोकांना ठार मारले
    १९६३ : बिर्ला तारांगण हे आशियातील पहिले तारांगण कलकत्ता येथे सुरु झाले
    १९९१ : हैती मध्ये लष्करी उठाव झाला
    २००८ : लेहमन ब्रदर्स व वॊशिंग्टन म्युच्युअल या वित्तीय संस्थांच्या दिवाळखोरीमुळे न्यू यॉर्क स्टॉक एक्सचेंज चा निर्देशांक ७७८ ने पडला . अमेरिकन शेअर बाजारातील ती सर्वात मोठी घट होती.

• मृत्यू :
१९९१ : आग्रा घराण्याच्या ११ व्या पिढीतील गायक उस्ताद युनूस हुसेन खों यांचे निधन ( जन्म : १५ नोव्हेंबर, १९२७ )

  • जन्म :
    १८९० : पंचांगकर्ते ल. गो. तथा नानाशास्त्री यांचा जन्म
    १९२५ : समाजसेवक डॉ शरदचंद्र गोखले यांचा जन्म ( मृत्यू : १५ जानेवारी, २०१३ )
    १९२८ : राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ब्रजेश मिश्रा यांचा जन्म ( मृत्यू : २८ सप्टेंबर, २०१२ )
    १९३२ : विनोदी अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते मेहमूद यांचा जन्म ( मृत्यू : २३ जुलै, २००४)
    १९४७ : भारताचे ३८ वे सरन्यायाधीश एस एच कपाडिया यांचा जन्म ( मृत्यू : ४ जानेवारी, २०१६ )
आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »