150 प्र.मे.टन प्रमाणे ऊसबिल बँक खाती वर्ग

चेअरमन यशराज देसाई यांची माहिती
दौलतनगर : लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याने सन 2022-23 चा गळीत हंगाम राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री नामदार शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली, कारखाना व्यवस्थापनाने यशस्वीपणे पार पाडत गळीतास आलेल्या ऊसाच्या एफ.आर.पी.पोटी रु. 150/- प्र.मे.टन प्रमाणे होणारी दुसऱ्या टप्प्यातील रक्कम रु.325.48 लाख संबंधित ऊस पुरवठादारांच्या बँक खाती आज रोजी वर्ग करण्यात आली, अशी माहिती कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.
पत्रकात पुढे म्हटले आहे की, आपले लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याने सन 2022-23 चे गळीत हंगामामध्ये 2,16,982.920 मे.टन ऊस गाळप करुन सरासरी 12.07 टक्के साखर उताऱ्याने 2,61,790 क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. कारखान्याची सन 2022-23 चे गळीत हंगामामध्ये अंदाजित निव्वळ देय एफ.आर.फी.रु.2800/- प्र.मे.टन होत असून हंगाम 2022-23 मधील एफ.आर.पी.पोटी रु.2500/- प्र.मे.टन प्रमाणे यापूर्वीच रु. 5424.57 लाख रक्कम ऊस पुरवठादारांना अदा केली आहे.
तसेच उर्वरित रकमेपोटी रक्कम रु. 150/- प्र.मे.टन प्रमाणे रु.325.48 लाख आज संबंधित ऊस पुरवठादारांच्या बँक खाती आजरोजी वर्ग केली असून संबंधित ऊस पुरवठादारांनी संबंधित सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संबंधित शाखेशी संपर्क साधावा.
पत्रकात पुढे म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक व महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री व सातारा, ठाणे जिल्हा पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना व्यवस्थापनाने आर्थिक नियोजन करुन सन 2023-24 च्या गळीत हंगामाची तयारी सध्या सुरु असून आधुनिकीकरणासह विस्तारीकरणाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण होऊन दुसऱ्या टप्प्याचे कामकाज प्रगतीपथावर आहे.
तसेच उर्वरित शिल्लक एफ.आर.पी.पोटी देय रक्कम लवकरच अदा करण्याचा कारखाना व्यवस्थापनाचा प्रयत्न राहणार आहे. कारखाना कार्यक्षेत्रातील सर्व ऊस उत्पादक सभासद शेतकरी यांनी आपला पिकविलेला सर्व ऊस आपले लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्यास नोंद करून, सन 2023-24 चा गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहनही शेवटी प्रसिध्दीपत्रकात केले आहे.