‘यशवंत’च्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदी जगताप, काळे बिनविरोध
पुणे : जिल्ह्यातील थेऊर (ता. हवेली) येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी सुभाष चंद्रकांत जगताप व उपाध्यक्षपदी मोरेश्वर पांडुरंग काळे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
अनेक वर्षांपासून बंद असलेल्या “यशवंत”च्या संचालक मंडळाची निवडणूक नुकतीच पार पडली होती. निवडणूक अधिकारी डॉ. शीतल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कारखाना स्थळावर अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडीसाठी नवनिर्वाचित संचालक मंडळाची बैठक झाली.
या बैठकीत अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी अनुक्रमे सुभाष जगताप व मोरेश्वर काळे या दोघांचेच उमेदवारी अर्ज आल्याने, डॉ. शीतल पाटील यांनी जगताप व काळे यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली.
यावेळी माजी सभापती प्रताप गायकवाड, पॅनेल प्रमुख प्रकाश जगताप, बाजार समितीचे विद्यमान संचालक प्रशांत काळभोर व हवेली पंचायत समितीचे माजी सदस्य बाळासाहेब चौधरी यांच्यासह कारखान्याचे नवनिर्वाचीत संचालक संतोष आबासाहेब कांचन, सुनिल सुभाष कांचन, सुशांत सुनिल दरेकर, शशिकांत मुरलीधर चौधरी, विजय किसन चौधरी, ताराचंद साहेबराव कोलते, योगेश प्रल्हाद काळभोर, मोरेश्वर पांडुरंग काळे, अमोल प्रल्हाद हरपळे, राहुल सुभाष घुले, किशोर शंकर उंद्रे, रामदास सिताराम गायकवाड, सुभाष चंद्रकांत जगताप, हेमा मिलींद काळभोर, रत्नाबाई माणिक काळभोर, दिलीप नाना शिंदे, मोहन खंडेराव म्हेत्रे, कुंडलिक अर्जून थोरात, सागर अशोक काळभोर, नवनाथ तुकाराम काकडे, शामराव सोपाना कोतवाल आदी उपस्थित होते.
“यशवंत”च्या संचालक मंडळाच्या एकवीस जागांसाठी नऊ एप्रिल रोजी पार पडलेल्या निवडणुकीत हवेली बाजार समितीचे माजी सभापती प्रताप गायकवाड, बाजार समितीचे विद्यमान संचालक व माजी सभापती प्रकाश जगताप, बाजार समितीचे विद्यमान संचालक प्रशांत काळभोर आणि हवेली पंचायत समितीचे माजी सदस्य बाळासाहेब चौधरी यांच्या नेतृत्वाखालील अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीने २१ पैकी १८ जागा जिंकत एकतर्फी विजय प्राप्त केला होता. तर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष माधव काळभोर व बाजार समितीचे विद्यमान सभापती दिलीप काळभोर यांच्या नेतृत्वाखालील अण्णासाहेब मगर रयत सहकार पॅनेलला अवघ्या तीन जागांवर समाधान मानावे लागले होते.