यंदाही एफआरपीपेक्षा जादा दर देणार : बजरंग सोनवणे

आवडल्यास ही बातमी शेअर करा

बीड : येडेश्वरी साखर कारखाना सन २०२३-२४ या वर्षातही एफआरपीपेक्षा जादा दर शेतकऱ्यांच्या उसाला देईल, असे आश्वासन संस्थापक अध्यक्ष बजरंग बप्पा सोनवणे यांनी दिले.

कारखान्याच्या दहाव्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. त्यावेळी त्यांनी कारखान्याच्या प्रगतीचा आढावा घेतला. प्रारंभी कारखान्याचे प्रमोटर सचिन काळे यांच्या हस्ते बॉयलरचे सपत्नीक विधिवत पूजन करण्यात आले.

या कार्यक्रमास माजी जि.प. सदस्य शंकर उबाळे, येडेश्वरी कारखान्याचे संचालक श्रीधर बाबा भवर, बाळकृष्ण भवर, माजी सभापती अशोक तारळकर, विलास सोनवणे, बालासाहेब बोराडे, गाताडे गुरुजी, रमेश आबा शिंदे, पंचायत समितीचे माजी सदस्य शिवाजी चौधरी, नारायण दादा शिंदे, पिंटू ठोंबरे, प्रेमचंद कोकाटे, तसेच भागातील सरपंच सेवा सोसायटीचे चेअरमन, प्रमुख कार्यकर्ते, ऊस उत्पादक शेतकरी, कर्मचारी आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक संचालक बाळकृष्ण भवर यांनी केले. त्यांनी आपल्या भाषणात एफआरपीपेक्षा १५० रुपये अधिक भाव दिल्याबद्दल शेतक-यांच्या वतीने बजरंग बप्पा सोनवणे यांचे आभार मानले. तसेच पंचक्रोशीतील शेतकरी बांधवांनी येडेश्वरी कारखान्यालाच ऊस गाळपास द्यावा असे आवाहन केले.
अध्यक्षीय समारोपामध्ये बोलताना सोनवणे म्हणाले, येडेश्वरी शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबध्द आहे. गळीत हंगामात २०२३-२४ साठी शेतकरी, सभासद यांना कारखान्यास ऊस देण्याचे आवाहन मी करत आहे. कारखान्याच्या जुन्या सभासदांना लाभांश दिला जाईल. तसेच दीपावली सणानिमित्त कारखान्याच्या सर्व कर्मचा-यांना दिवाळी बोनसही मी या निमित्ताने जाहीर करत आहे.

गेल्या हंगामात एफआरपीपेक्षा १५० रुपये जास्त भाव दिलेला आहे व येणाऱ्या गळीत हंगामात एफआरपीपेक्षा अधिक भाव देण्यात येईल असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरज खोडसे यांनी केले तर आभारप्रदर्शन लक्ष्मण शिंदे यांनी केले.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »