उसाला एफआरपीपेक्षा जादा दर, कामगारांना चांगला पगार : खा. सोनवणे
बीड : उसाला एफआरपीपेक्षा जादा भाव आणि कामगारांना चांगला पगार देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, अशी घोषणा येडेश्वरी साखर कारखान्याचे चेअरमन खा. बजरंगबप्पा सोनवणे यांनी केली आहे.
येडेश्वरी साखर कारखान्याच्या सन २०२४-२५ या वर्षाच्या अकराव्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ येडेश्वरी साखर कारखान्याचे चेअरमन खासदार बजरंगबप्पा सोनवणे यांच्या हस्ते आणि शेतकरी कामगार पक्षाचे राज्य कमिटी सदस्य भाई मोहन गुंड, माजी जिल्हा परिषद सदस्या सारिका सोनवणे व सोनवणे परिवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. त्यावेळी ते बोलत होते.
रामेश्वर उबाळे व त्यांच्या सुविद्य पत्नी सीमा रामेश्वर उबाळे यांच्या शुभ हस्ते विधिवत पूजा करण्यात आली. सुरुवातीला कार्यक्रमाचे प्रास्ताविक कारखान्याचे संचालक प्रा. बाळकृष्ण भवर यांनी केले तर बाळासाहेब गलांडे, नारायण शिंदे, यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या प्रसंगी ज्येष्ठ नेते नवाब मामु, खरेदी विक्री संघाचे चेअरमन बालासाहेब दादा बोराडे, व्हॉईस चेअरमन पिंटू ठोंबरे, दिलिप आबा गुलभिले, रमेश आबा शिंदे, गटनेते भाऊसाहेव गुंड, माजी सभापती अशोक तारळकर, नारायण शिंदे,विलास जोगदंड, संजीवनीताई देशमुख, शंकर जाधव, बंडू चौधरी, लाला वायबसे, शितल लांडगे, तसेच सभासद, शेतकरी, ठेकेदार, कामगार व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कारखान्याच्या जडणघडणीत ज्यांचा सिंहाचा वाटा आहे ते शेतकरी आणि कामगार यांचे हित कारखाना जोपसणार असून, शेतकऱ्यांच्या ऊसाला एफआरपी पेक्षा जास्त भाव व देणार आहे. तसेच कामगार वर्गांना समाधान कारक पगार दिला जाणार आहे असे खा. बजरंग सोनवणे म्हणाले.
कारखान्याच्या माध्यमातून खा. सोनवणे यांनी शेतकरी आणि कामगार वर्गासह तरुणांच्या हाताला काम देवून त्यांचे कल्याण केले असे उद्गार शेकापचे नेते मोहन गुंड यांनी काढले.