‘एफआरपी’पेक्षा अधिक भाव देणार : बजरंग सोनवणे
येडेश्वरी कारखाना युनिट -१ चा ९ वा गळीत हंगामाचा शुभारंभ संपन्न
केज – तालुक्यातील आनंदगाव सा. येथील येडेश्वरी साखर कारखान्याचा ९ वा गळीत हंगामाचा शुभारंभ ह.भ.प.श्री.प्रकाश महाराज बोधले, ह.भ.प.श्री.श्रीकृष्ण महाराज यांच्या शुभहस्ते पारंपरिक पद्धतीने काटापूजन, गव्हानपूजन करून मोळी टाकण्यात आली.
अध्यक्षीय भाषणामध्ये येडेश्वरी कारखान्याचे चेअरमन बजरंग सोनवणे म्हणाले, कारखाना पारदर्शक पध्द्तीने चालतोय, या वर्षी 10 लाख मेट्रिक टन पेक्षा जास्त उदिष्ट असून ते आपण सगळ्याच्या सहकार्याने पूर्ण करणार आहोत.
बीड जिल्ह्यात तर सगळ्यात जास्त आपल्या कारखान्याच्या भाव तर नकीच राहणार असून मराठवाड्यात जास्त भाव देण्यासाठी माझा प्रयत्न असणार आहे. यावेळी कारखान्याचे तत्कालीन व्हाईस चेअरमन कै. कल्याण तात्या शिनगारे यांचा उल्लेख करताना चेअरमन सोनवणे भावूक झाल्याचे दिसले.
तसेच येणा-या प्रत्येक राजकीय निवडणुकीत मी माझ्या कार्यकत्यासोबत खंबीरपणे उभा आहे. होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवणुकीसाठी भावी सरपंच उपसरपंच यांना यावेळी त्यांनी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्तविक येडेश्वरीचे संचालक बाळकृष्ण (बापू) भवर यांनी केले तर ह.भ.प. श्री.प्रकाश महाराज बोधले, ह.भ.प.श्री.श्रीकृष्ण महाराज चव्हार, श्रीधर (बाबा) भवर, नंदू दादा मोराळे,बबनभैय्या लोमटे यांनी आपले विचार मांडत बजरंग सोनवणे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब धायगुडे यांनी व आभार प्रदर्शन सुरज खोडसे यांनी केले.
यावेळी येडेश्वरी साखर कारखान्याचे संचालक श्रीधर (बाबा ) भवर, तज्ञ शेतकरी लालासाहेब पवार, जेष्ठ नेते नवाब मामू, माजी जि.प.सदस्य शंकरआण्णा उबाळे, संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष बाळासाहेब दादा बोराडे, माजी उपनगराध्यक्ष बबनभैय्या लोमटे, उद्योजक नामदेव (बापू ) खराडे, किशोर (नाना) हंबर्डे, रा.काँ.केजचे तालुकाध्यक्ष नंदूदादा मोराळे, महिला तालुकाध्यक्ष संजीवनी देशमुख,डॉ.ऋषिकेश भवर, माजी पंचायत समिती सदस्य नारायण दादा शिंदे,शिवाजी (बंडू) चौधरी, उमाकांत (अप्पा )भुसारी, पिंटू ठोंबरे,प्रेमचंद कोकाटे, न.प. केजचे गटनेते भाऊसाहेब गुंड, मुकुंद कणसे, अशोकतात्या तारळकर, विलासआप्पा जोगदंड, पंचक्रोशीतील सरपंच,उपसरपंच, सोसायटी चेअरमन, संचालक, शेतकरी सभासद, बिगर सभासद, अधिकारीवर्ग, कर्मचारीवर्ग, वाहतूक ठेकेदार, तसेच असंख्य शेतकरीवर्ग उपस्थित होते.