यशवंत कुलकर्णी यांचा हृद्य सत्कार
शिराळा : कारखान्यांची प्रगती ही कार्यकारी संचालकाच्या कामावर अवलंबून असते. केंद्र व राज्य शासनाने साखर उद्योगाच्या बाबतीत आपली धोरणे बदलावीत, असे प्रतिपादन आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले.
नाटोली (ता. शिराळा) येथे श्रीपूर येथील पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक व महाराष्ट्र राज्य एम. डी. असोसिएशनचे उपाध्यक्ष यशवंत कुलकर्णी यांना भारत शुगर संस्थेचा देश पातळीवरील उत्कृष्ट कार्यकारी संचालक पुरस्कार मिळाल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमास माजी मंत्री शिवाजीराव नाईक, आमदार विनय कोरे, सत्यजित देशमुख यांची उपस्थिती होती. आनंदराव चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. शिवाजीराव नाईक तसेच विनय कोरे यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी डॉ. यशवंत कुलकर्णी यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार झाला. यावेळी शैलेंद्र जयस्वाल, बी. डी. पवार, कैलासराव खुळे, समीर सलगर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अभिजित पाटील, महादेव कदम, ‘विश्वास’चे माजी कार्यकारी संचालक राम पाटील, रणजितसिंह नाईक, सरपंच टी. डी. पाटील, पश्चिम महाराष्ट्रातील विविध कारखान्यांचे कार्यकारी संचालक उपस्थित होते.